Home /News /entertainment /

स्वप्न सत्यात उतरल्यानं भावुक झाली हरनाज कौर संधू; 'Miss Universe'चा किताब मिळताच कोसळलं रडू, VIDEO

स्वप्न सत्यात उतरल्यानं भावुक झाली हरनाज कौर संधू; 'Miss Universe'चा किताब मिळताच कोसळलं रडू, VIDEO

Harnaaz Sandhu Video: मिस युनिव्हर्स म्हणून आपलं नाव घोषित होताच हरनाज कौरच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

  नवी दिल्ली 13 डिसेंबर : मिस युनिव्हर्स होणं हे जवळपास प्रत्येक तरुणीचं स्वप्न असेल. मात्र, इथपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण, खडतर आणि तितक्याच संघर्षाचा असतो. नुकतंच मिस युनिव्हर्स  2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय तरुणी हरनाज कौर संधूनं 70 वा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे (India's Harnaaz Sandhu becomes Miss Universe 2021). सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतानं 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे विजेतेपद पटकावलं आहे. मिस युनिव्हर्स म्हणून आपलं नाव घोषित होताच हरनाज कौरच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

  सुष्मिता सेन, लारा दत्तानंतर 21 वर्षांनंतर भारताला 'Miss Universe'चा किताब

  व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की अगदी आतुरतेने हरनाज कौर संधू मिस युनिव्हर्स 2021 चा किताब कोणाला मिळणार हे ऐकण्यासाठी उभा आहे. तिच्या चेहऱ्यावर यावेळी आत्मविश्वास आणि भीती दोन्ही पाहायला मिळतं. मात्र मिस युनिव्हर्स 2021 चा किताब भारताला मिळाल्याचं ऐकताच तिला अश्रू अनावर होतात.
  आपलं नाव ऐकताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात.

  लाईव्ह बातम्या सांगतानाच अचानक पडला महिला अँकरचा दात अन्...; पाहा Shocking Video

  हरनाज कौर संधूला मिस युनिव्हर्सचा किताब मिळताच तिचे व्हिडिओ समोर आले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तिला हा किताब जाहीर झाल्याचं पाहायला मिळतं.
  दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती तिला प्रश्न विचारतात की तू कोण आहेस, यावेळी अतिशय अभिमानाने ती आपण मिस युनिव्हर्स 2021 असल्याचं सांगते. यात तिच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी स्पष्टपणे झळकताना दिसतो.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Entertainment

  पुढील बातम्या