Home /News /entertainment /

India's Got Talent: 5 वर्षाच्या चिमुकलीनं आईसोबत गायलं 'घर मोरे परदेसिया' ; शिल्पा शेट्टी झाली आश्चर्यचकीत

India's Got Talent: 5 वर्षाच्या चिमुकलीनं आईसोबत गायलं 'घर मोरे परदेसिया' ; शिल्पा शेट्टी झाली आश्चर्यचकीत

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (India’s Got Talent) हा छोट्या पडद्यावरली लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आपल्या टॅलेंटने प्रेक्षकांना आणि परिक्षकांना आकर्षित करत असतात.

  मुंबई, 23 जानेवारी- ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (India’s Got Talent) हा छोट्या पडद्यावरली लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आपल्या टॅलेंटने प्रेक्षकांना आणि परिक्षकांना आकर्षित करत असतात. आता या शोमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुकलीने असं काही केलं ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पाच वर्षाच्या चिमुकलीने असं गाणं गायले की परीक्षक देखील आश्चर्यचकीत झाले. सोनी टीव्हीने नुकताच एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये एक चिमुकली आपल्या आईसोच्या सुरात सुर मिळवत गाणं गाताना दिसत आहे. ती आईसोबत ‘घर मोरे परदेसिया’ हे अवघड असं गाणं अगदी सुरात गाताना दिसत आहे. प्रोमोमध्ये शिल्पा देखील म्हणताना दिसत आहे की, माझ्या अंगावह हिच गाणं ऐकून शहारे आले. या प्रोमोच्य कॅप्शनेमध्ये म्हटले आहे की, ‘मुक्ता आणि प्रज्ञाच्या या क्यूट जोडीचा ड्यूट ऐकून परीक्षकांच्या चेहऱ्यावर देखील आली मोठी स्माईल. वाचा-...अशी दिसते अनुष्काची लेक, बाबा विराटला चेअर करताना कॅमेऱ्यात कैद परीक्षक देखील करत आहेत कौतुक या शोचे परीक्षक तर या चिमुकले कौतुक करत आहेत. पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातलेल्या आणि पोनी टेल बांधलेलया या पाच वर्षाच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. किरण खेर, बादशाह, मनोज मुंताशिर आणि शिल्पा शेट्टी सगळे तिला गाणं म्हणत असताना प्रेमाने पाहत होतो. मनोज यांनी तर उभं राहून या चिमुकलीचं गाणं ऐकले. तिच्या गाण्यानंतर सर्व परीक्षकांनी स्टॅंडिंग ओव्हेशन दिले.
  सोशल मीडिया या चिमुकलीचीच चर्चा माय लेकीचा हे गाणं प्रेक्षकांना खूप भावलं आहे. या व्हिडिओवर लोक कमेंटचा वर्षाव करत आहेत. या माय लेकीच गाण पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. सोशल मीडियावर या चिमुकलीते चाहते निर्माण झाले आहेत. मात्र परीक्षकांनी देखील तिला काय कमेंट दिल्या आहेत याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Shilpa shetty

  पुढील बातम्या