Home /News /entertainment /

सईचा IFFA लुक डिझाईन करणारी भारताची पहिली Transwoman डिझायनर माहिती आहे का?

सईचा IFFA लुक डिझाईन करणारी भारताची पहिली Transwoman डिझायनर माहिती आहे का?

फॅशन जगतात रोज काहीनाकाही घडामोडी घडत असतात. कलाकारांचे असांख्य लुक रोज चर्चेत येतात. ते लुक डिजाईन करण्यासाठी जे फँशन डिझायनर काम करतात त्यांचासुद्धा कौतुक होतं. आयफा 2022 सोहळ्यात अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) लुक डिजाईन करणारी भारतातली एक खूप आगळीवेगळी फॅशन डिझायनर तुम्हाला माहित आहे का?

पुढे वाचा ...
  मुंबई 6 जून: आजकालच्या जमान्यात जिथे फॅशन आणि कपड्याने इतकं महत्त्व दिल जातं तिथे प्रत्येक नट-नटींच्या छोट्यात छोट्या लुकची सुद्धा बेफाम चर्चा होते. एअरपोर्ट लुकपासून लग्न,मेहंदी,पार्ट्या,अवॉर्ड सोहळ्यापर्यंत कलाकार जिथे असतील पहिले त्यांच्या आऊटफिटची चर्चा केली जाते. हे लुक कसे असले पाहिजे त्याबद्दल नियोजन करायला लागतं. हे सगळं काम स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर यांचं असतं. आज आपल्याकडे अनेक मोठमोठे फॅशन डियनर आहेत ज्यांचे कपडे आयुष्यात एकदा घालण्यासाठी लोक उत्सुक असतात. या सगळ्या नावांमध्ये सध्या भारतातील पहिल्या Transwoman फॅशन डिझायनरची बरीच चर्चा होत आहे.  कोण आहे ही फॅशन डिझायनर? साईशा शिंदे (Saisha Shinde) असं या मराठमोळ्या फॅशन डिझायनरचं नाव आहे. साईशा नुकतीच (Kangana Ranaut) कंगना रनौतच्या लॉकअप सीजन १ मध्ये दिसली होती. साईशा ही भारतातील पहिली transwoman फॅशन डिझायनर आहे. तिचं याआधी नाव स्वप्नील असं होतं. २०२१ मध्ये एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिने आपल्या या नव्या अस्तित्वाची ओळख सगळ्यांना करून दिली. साईशाला 15 व्या वर्षी हे जाणवलं की ती तिच्या शरीरात कम्फर्टेबल नाही आहे आणि एक मुलगा असूनही तिला मुलांमध्ये रस आहे. तिने वयाच्या चाळीशीत येत येत आपलया अस्तित्वाची नवी ओळख जगाला करून देण्याचा निर्णय घेतला.  साईशाच्या घरून तिला खूप पाठिंबा मिळाला. तिच्या वडिलांनी तिला खूप लवकर आपलंस केलं, तिच्या निर्णयाचं स्वागत केलं. आईने सुद्धा वेळ घेऊन विचार केला आणि तिला आहे त्या पद्धतीने स्वीकारलं. स्वप्नील मधून सैषा बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास फार रंजक पण तितकाच खडतर होता. 2006 मध्ये स्वप्नीलने  (आताची साईशा) लॅक्मे फॅशन वीकमधून फॅशन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. तिच्या कामाला अनेक फॅशन क्रिटिक्सकडून वाहवा मिळत गेली आणि साईशा आज बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्रींचे कपडे डिजाईन करताना दिसते. दीपिका पदुकोण, करीन कपूर अशा अनेक अभिनेत्रींनसाठी तिने अनेक सुंदर आऊटफिट डिजाईन केले आहेत. साईशाने फॅशन, गुझारिश, लक्ष्मी अशा चित्रपटांसाठी स्टायलिस्ट म्हणून काम केलं आहे.
  आजकालच्या जगात जिथे कलाकारांच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत त्यांनी काय परिधान केलं आहे यावर सगळ्यांचं लक्ष असतं तिथे साईशाने असा एक सुंदर लुक डिजाईन केला ज्याकडे लोक पाहत राहिले. साईशाला २०२१ ची 'मिस युनिव्हर्स' किताब जिंकणारी भारतीय मॉडेल हरनाझ कौर संधू (Harnaaz Kaur Sandhu) हीच आऊटफिट डिजाईन करण्याची संधी मिळाली होती. हरनाझच्या आऊटफिटकडून असलेल्या अपेक्षा, मिस युनिव्हर्स किताबाला शोभेल अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करत तिने हा आऊटफिट डिजाईन केला होता. तिचा या आऊटफिटचं भयानक कौतुक झालं होतं.  हे ही वाचा-  जेव्हा महानायक अमिताभ बच्चन करतात सचिन खेडेकर यांची कॉपी... सचिन खेडेकरांनी सांगितला अफलातून किस्सा साईशाने नुकताच (Sai Tamhankar) सई ताम्हणकरसाठी आयफा सोहळ्याचा लुक डिजाईन केला होता. पांढऱ्या मोठ्या घागऱ्यासारख्या  दिसणाऱ्या घेरदार स्कर्टवर असलेलं मोती आणि टिकल्यांचं काम आणि त्याला दिलेला वेस्टर्न ट्विस्ट हा सुंदर आऊटफिट सगळ्यात हटके ठरला आणि सोहळ्यात खूपच गाजला. 
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood News, Fashion, Sai tamhankar

  पुढील बातम्या