Home /News /entertainment /

भारताला पहिला Oscar मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

भारताला पहिला Oscar मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

फोटो सौजन्य - GETTY IMAGES

फोटो सौजन्य - GETTY IMAGES

भानू अथैय्या (bhanu athaiya) यांना 1983 साली गांधी या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

    मुंबई, 15 ऑक्टोबर :  सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार ऑस्करवर (Oscar) भारताचं नाव कोरणाऱ्या वेशभूषाकार (Costume designer) भानू अथैय्या (Bhanu Athaiya) यांचं निधन झालं आहे.  भारतासाठी त्यांनी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. दीर्घकालीन आजारामुळे त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मूळच्या मराठी असलेल्या भानू यांना 1983 साली गांधी या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आजारपणामुळे गेल्या काही वर्षांपासून त्या एकाच ठिकाणी होत्या. गुरुवारी सकाळी त्यांचं निधन झाल्याची बातमी मिळते आहे. त्यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची बातमी दिल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. भानू अथैय्या या मूळच्या मराठी. भानुमती आण्णासाहेब राजोपाध्ये असं त्यांचं नाव. 1982 मधील गांधी या चित्रपटातील वेशभूषेसाठी भानू यांना ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. रिचर्ड अटनबरो या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. याशिवाय आमिर खानच्या लगान आणि शाहरूख खानच्या स्वदेश या चित्रपटांसाठीदेथील त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम पाहिलं होतं. हे वाचा - 'बाहुबली' अभिनेत्रीने कोरोनाला हरवलं; घरी येताच खास सदस्याने धावत येत मारली मिठी 2012 साली भानू यांनी ऑस्करची ट्रॉफी परत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या मृत्यूनंतर ती ट्रॉफी सुरक्षित राहावी अशी त्यांची इच्छा होती. ट्रॉफीच्या सुरक्षेचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. भारतात यापूर्वी अनेक पुरस्कार गायब झाले आहेत. मी इतकी वर्षे हा पुरस्कार सांभाळून ठेवला आहे, भविष्यातही तो सुरक्षित राहावा, अशी माझी इच्छा आहे, असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood, Oscar

    पुढील बातम्या