Home /News /entertainment /

मलायकानं पहिल्यांदाच सांगितलं पूर्वायुष्यातलं धक्कादायक सत्य; वडील सोडून गेले आणि...

मलायकानं पहिल्यांदाच सांगितलं पूर्वायुष्यातलं धक्कादायक सत्य; वडील सोडून गेले आणि...

बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मलायकानं पहिल्यांदा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

  मुंबई, 04 मार्च : सध्या अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्याविषयी फारशी बोलताना दिसत नाही. कोणत्याही मुलाखतीत किंवा कार्यक्रमात ती तिच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलणं नेहमीच टाळताना दिसते. मलायकानं तिच्या करिअरसोबत वैयक्तीक आयुष्यातही अनेक चढ उतार पाहिले आहेत. आज बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मलायकानं पहिल्यांदा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. सध्या इंडियाज बेस्ट डान्सरची ऑडिशन हरियाणा येथे सुरू आहे. यामध्ये एक स्पर्धक अशी होती. जिने सांगितलं की ती जेव्हा 2 वर्षांची होती त्यावेळी तिच्या वडीलांनी तिच्या आईला सोडून दिलं होतं. त्यानंतर तिचं पालनपोषण तिच्या आईनं एकटीनंच केलं. एवढंच नाही तर तिची एक लहान बहीण सुद्धा आहे. दोन्ही मुलींच्या स्वप्नांसाठी त्यांची आई त्यांना पूर्ण पाठिंबा देत असल्याचं तिनं सांगितलं. सई ताम्हणकरच्या पायाला दुखापत, त्याच अवस्थेत करते आहे सिनेमाचं शूटिंग या मुलीच्या डान्स नंतर जेव्हा तिची आणि तिच्यासोबत स्टेजवर आली. तेव्हा तिनं सांगितलं, तिचे पती तिला खूप मारहाण करत असत. त्यामुळे त्या आपल्या पतीपासून वेगळ्या झाल्या आणि त्यांनी एकट्यानंच आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ केला. या मुलीची कहाणी ऐकल्यावर मलायकानं सांगितलं की तिची आणि या स्पर्धक मुलीची लाइफ स्टोरीमध्ये बरंच साम्य आहे. असं म्हणून मलायका अचानक रडू लागली. ‘मी अद्याप जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळेच’ अभिनेता इरफान खान झाला भावुक
  मलायका म्हणाली, ज्याप्रमाणं या मुलीला मोठं झाल्यावर डान्सर व्हायचं होतं तशीच काहीशी मी सुद्धा होते. ज्याप्रमाणे या मुलीच्या वडीलांनी त्यांना सोडून दिलं आहे तसंच माझ्या वडीलांनीही आम्हा दोन्ही बहीणींना आईसोबत सोडून दिलं होतं आणि आमच्या आईनं आमचा सांभाळ एकटीनं केला. त्यामुळे आई हीच आमचे वडीलही होती. मी 11 वर्षांची असताना माझ्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला होता.
  View this post on Instagram

  Happy bday my Amu,amzu,amolla,amutti,ams, ..... alll names of endearment , coz we love u♥️(p.s . Now don’t cry n get emo)

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

  मलायकानं पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्यातंल हे धक्कादायक सत्य सर्वांशी शेअर केलं. पण त्यानंतर तिला आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर तिचा मित्र टेरेन्स लुईसनं तिला शांत केलं. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनमुळे खूप चर्चेत आहे. अर्जुनसोबतच्या नात्याची कबुली देण्यासाठीही मलायकानं बराच वेळ घेतला होता. अखेर त्याच्या वाढदिवसाला त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत तिनं हे नातं कबुल केलं होतं. नीना गुप्ताच्या मुलीनं घेतला घटस्फोट, पती होता बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Malaika arora

  पुढील बातम्या