मुंबई, 22 डिसेंबर: करोनाच्या (Covid 19) संकटानं सुरू झालेलं 2020 हे वर्ष आता लवकरच संपणार आहे. या संपूर्ण वर्षात सर्वाधिक दिवस नागरिक घरी असल्यानं गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. या काळात गुगलवर(Google) काय सर्च केलं गेलं याचा आढावा घेणार आहोत. सध्या युग तंत्रज्ञानाचं असल्यानं कोणतीही शंका मनात आली की, कुणीही पटकन गुगल सर्च (Google Search) करून उत्तर मिळवतो. या वर्षभरात भारतीयांना कोणत्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता होती? काय सर्वाधिक सर्च केलं गेलं? याची माहिती गुगलने जाहीर केली आहे. यामध्ये गायिका नेहा कक्करबद्दलची माहिती सर्वाधिक सर्च केल्याचं समोर आलं आहे.
गुगलने प्रसिद्ध केलेल्या या यादीत कोरोनाच्या काळातदेखील भारतीय नागरिकांनी नेहा कक्करच्या (Neha Kakkar) नावाला पसंती दिली असून सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींमध्ये आयपीएलचा समावेश आहे. जगभरातील माणसं कोरोनाविषयी गुगलवरून जाणून घेत होती. मात्र, भारतात वेगळाच सर्च सुरू होता. भारतात करोनाविषयी माहिती मोठ्या प्रमाणात सर्च केली जात नव्हती. तर लोकांना आयपीएल विषयी (Indian Premier League - IPL) जाणून घेण्यात उत्सुकता होती. भारतात सध्या कोरोना व्हायरसचं संकट आहे. पण भारतीयांनी या विषयी सर्वाधिक सर्च केलं नसून नेहा कक्करविषयी सर्च केलं. नेहा कक्करचा आपला पती रोहनप्रितसह(Rohanpreet Singh) प्रेग्नेंट असल्याचा फोटो समोर आला होता. त्यानंतर गुगलवर नागरिकांनी उड्या मारत नेहा कक्करविषयी विविध गोष्टी सर्च केल्या. त्यानंतर तिने हा स्टंट आपला आगामी 'Khyaal Rakhya Kar'या गाण्यासाठी केल्याचं समोर आलं. यामध्ये ती प्रेग्नंट दिसत असून इतक्या लवकर ती प्रेग्नंट कशी झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना आणि भारतीयांना पडला होता. त्यामुळं 18 डिसेंबरला तिने हा फोटो टाकल्यानंतर हे सर्चिंगचे प्रमाण वाढलं होतं.
नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) यांचा नुकताच विवाह झाला आहे. त्यामुळं इतक्या लवकर नेहा प्रेग्नंट कशी झाली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी यावर मिम्स तयार केले. मोठ्या प्रमाणात तिला ट्रोलदेखील करण्यात आलं. त्यामुळं कोरोनाच्या या कालखंडात देशभरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना भारतीयांना मात्र याचं काहीही घेणं-देणं नसल्याचं यामधून समोर येत आहे. सध्या भारतात 3,08,751 ॲक्टिव्ह केस असून मागील 24 तासात 26,624 रुग्णांची वाढ झाली असून 341 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 1,45,477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी गुगलच्या सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये 'What is Binod' हेदेखील सर्च करण्यात आलं आहे. या लिस्टवरून भारतीयांचं प्राधान्य कशाला आहे. हे दिसून आलं आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.