Home /News /entertainment /

चित्रपटातील रेल्वेमधले सीन शूट करायला निर्माते मोजतात मोठी रक्कम; आकडा ऐकूनच चक्रावून जाल

चित्रपटातील रेल्वेमधले सीन शूट करायला निर्माते मोजतात मोठी रक्कम; आकडा ऐकूनच चक्रावून जाल

‘जा सिमरन जा’ हा आयकॉनीक सिन असणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ते ‘दिल से’ चित्रपटातील ‘चल छैया छैया’ हे सुपरहीट गाणं ते आताचे ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘बजरंगी भाईजान’ सारख्या अनेक चित्रपटांसाठी रेल्वेचा वापर करण्यात आला आहे.

  मुंबई 16 जून : आजवर अनेक चित्रपटांमध्ये रेल्वे (Railway)आणि रेल्वे स्थानकावरील दृश्य दाखवण्यात आली आहेत. त्यात ‘जा सिमरन जा’ हा आयकॉनीक सिन असणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ते ‘दिल से’ चित्रपटातील ‘चल छैया छैया’ हे सुपरहीट गाणं ते आताचे ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांचाही समावेश आहे. पण या चित्रिकरणासाठी निर्मात्यांना रेल्वेला मोठी रक्कम फी म्हणून द्यावी लागते. रेल्वे आणि रेल्वे स्थानकाच्या वापरानुसार ही रक्कम ठरवली जाते. काही दिवसांपूर्वीच भारतीय रेल्वेने चित्रपटांच्या शुटिंगसाठी वापरला जाणारा रेल्वे परिसर आणि मालगाडी ट्रेनचा परवाना यांचे दर वाढवले होते. वेगवेगळ्या चित्रिकरणाचे वेगवेगळे दर ठरलेले असतात. त्यानुसार ही रक्कम द्यावी. तसेच हे पर डे च्या हिशोबाने पैसे द्यावे लागतात.
  जसे की  चित्रपटाचे चित्रिकरण रेल्वे किंवा रेल्वे स्थानकाच्या आवारात होत असेल, तर  A आणि A1 श्रेणीतील स्थानकांसाठी एका दिवसासाठी 1 लाख रुपये मोजावे लागतात. तर B1 आणि B श्रेणीतील स्थानकांना दररोज 50 हजार रुपये द्यावे लागतात. याशिवाय रेल्वेच्या व्यस्त कामकाजात चित्रिकरण करायचे असेल तर 15% अतिरिक्त शुल्क भरावे लागते.

  नेहा कक्करने सुशांतसाठी गायलेलं खास गाणं ऐकून चाहते भावुक, पाहा VIDEO

   भारतीय रेल्वेने  रेवाडी स्टीम लोको शेडचा वापर केला आहे, यामुळे ती एक वारसा म्हणून ठेवली गेली आहे. एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंजिन आणि 4 डब्यांची मागणी असेल तर रेल्वे एका दिवसासाठी सुमारे ५० लाख रुपये शुल्क आकारते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी 200 किमी आणि 5 वॅगनसाठी दररोज किमान 4,26,600 रुपये इतक शुल्क आकारलं जातं. अनेक चित्रपटांसाठी रेल्वेचा वापर आवश्यक असतो. अनेकदा सेटही उभारले जातात. पण प्रत्येकवेळी सेट उभारण शक्य नसल्याने खरी खुरी रेल्वे आणि रेल्वे स्थानक दाखवलं जातं.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Indian railway, Marathi entertainment, Shahrukh khan

  पुढील बातम्या