मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अखेर पवनदीपने अरुणीतासोबतच्या नात्यावर केला खुलासा; 'Indian Idol 12'च्या मंचावर जोडी ठरली हीट

अखेर पवनदीपने अरुणीतासोबतच्या नात्यावर केला खुलासा; 'Indian Idol 12'च्या मंचावर जोडी ठरली हीट

शोमधील कन्टेस्टंट अरुणीता कांजीलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) यांच्यातील नात्याची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसते. सोशल मीडियावरही ही जोडी हिट ठरली होती.

शोमधील कन्टेस्टंट अरुणीता कांजीलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) यांच्यातील नात्याची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसते. सोशल मीडियावरही ही जोडी हिट ठरली होती.

शोमधील कन्टेस्टंट अरुणीता कांजीलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) यांच्यातील नात्याची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसते. सोशल मीडियावरही ही जोडी हिट ठरली होती.

मुंबई 10 ऑगस्ट : छोट्या पडद्याचा प्रसिद्ध सिंगिग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12)  मध्ये या सीझनला अनेक धमाकेदार पर्फॉर्मन्सेस पाहायला मिळाले तसेच काही प्रेमरंगही पाहायला मिळाले. लवकरच कार्यक्रमाचा फिनाले होणार आहे. त्यासाठी प्रेक्षकही सज्ज आहेत. पण शोमधील कन्टेस्टंट अरुणीता कांजीलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) यांच्यातील नात्याची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसते. सोशल मीडियावरही ही जोडी हिट ठरली होती.

आता शोचा अंतिम टप्पा आला आहे. तेव्हा पवनदीपने त्याच्या आणि अरुणीताच्या नात्यावर अखेर भाष्य केलं आहे. पवनदीपने सांगितलं की, “अरुणीता आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा लव्ह अँगल नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र जास्त वेळ घावलवतो. त्यामुळे सर्व कन्टेस्टंट्समध्ये घट्ट नातं आहे.”

अखेर झाला खुलासा! तैमूरनंतर मुघल बादशहावरुन ठेवलं करिनाने दुसऱ्या बाळाचं नाव

पुढे पपनदीप म्हणाला, “कालांतराने सर्वांना सत्य समजेल. माझ्यात आणि अरुणीतामध्ये मैत्री शिवाय काही नाही. आता फक्त करिअरवर लक्ष केंद्रीत करायला हवं. प्रेम वैगरे या सर्व गोष्टीनंतर देखील होत राहतील.” असं उत्तर देत पवनदीपने त्यांच्या नात्याचा खुलासा केला. यामुळे पवनदीपने अरुणीतासोबतच्या नात्याला केवळं मैत्रीचं रुप दिलं आहे. तर चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सुरूवातीपासूनच ही जोडी विशेष लक्ष वेधून घेत होती. शोमध्ये त्यांचा लव्ह अँगल दाखवण्यात आला होता.

जुन्या कपड्यांपासून बनवते सेक्सी ड्रेस; अ‍ॅक्टिंगसह कटिंगमध्येही तरबेज Bigg Boss मधील उर्फी जावेद; पाहा VIDEO

लवकरच या शोचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यासाठी सगळे स्पर्धक सज्ज आहेत. पवनदीप 2015 मध्ये ‘द वॉइस’ या शोमध्ये पवनदीपने भाग घेतला होता. विशेष म्हणजे तो या शोचा विजेता देखील ठरला होता. तर त्यानंतर त्याने इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला. तर यामध्ये आपण केवळ विजेता होण्यासाठी आलो नाही तर नवं काहीतरली शिकण्यासाठी आलो आहोत असंही त्याने म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Indian idol, Tv shows