सलमान-रानूच्या भेटीनंतर हा VIDEO आला समोर

नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्या सलमानला भेटल्याचं समोर आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 09:42 AM IST

सलमान-रानूच्या भेटीनंतर हा VIDEO आला समोर

मुंबई, 2 सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या रानू बद्दल सर्वांनाच माहिती आहे. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडीओमुळे आज बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर झाल्या. त्यांचा हा प्रवास खरंच थक्क करणारा असाच आहे. प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानं त्यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांच अवघं आयुष्य बदललं. मागच्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खाननं त्यांना घर भेट दिल्याच्या चर्चा होत्या मात्र रानू यांनी एका मुलाखतीत अशी कोणतीही गोष्ट घडली नसल्याचं स्पष्ट केलं.तसेच त्या अद्याप सलमानला भेटल्या नाहीत असंही त्यांनी सांगितलं. मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्या सलमानला भेटल्याचं समोर आहे.

रानू मंडल यांनी सलमानच्या भेटीचं वृत्त फेटाळलं असलं तरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये त्या सलमानला भेटल्याचं दिसतं. मात्र हा सलमान खान नाही तर सलमान अली आहे. रानू मंडल यांचा चाहता वर्ग काही दिवसातच एवढा वाढला आहे की, प्रत्येकजण त्यांना भेटू इच्छितो. नुकतीच इंडियन आयडॉल सलमान अलीनं त्यांची भेट घेतली. यावेळचा एक व्हिडीओ त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात रानू यांचं ‘तेरी मेरी’ हे गाणं बॅकग्राउंला वाजताना दिसणार आहे तर रानू यावर लिपसिंक करताना दिसत आहेत आणि सलमान त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांचं कौतुक करत आहे.

सलमान अलीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. सलमानच्या या पोस्टचं सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. मात्र या दरम्यान काही लोकांनी पुन्हा एकदा बॉलिवूडला निशाणा केला आहे. एका युजरनं लिहिलं, आता त्या प्रसिद्ध झाल्यावर सर्वजण त्यांना विचारत आहेत. नाहीतर कोणी पाहिलंही नसतं. तर दुसऱ्या एका युजरनं विचारलं हे गाणं एवढंच आहे की, याच्या पुढेही काही आहे.

रानू यांची वेगवेगळी नावं

Loading...

आपल्या जादुई आवाजानं सर्वांना वेड लावणारी रानू मूळची पश्चिम बंगालच्या राणाघाटमधील राहणारी आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार रानूचं खरं नाव रेनू रे आहे. तर काही रिपोर्ट नुसार ती ज्यावेळी क्लबमध्ये गाणी गात असे त्यावेळी तिचं नाव बॉबी होतं. पुढे बबलू मंडल यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचं नाव रानू मंडल झाल्याचं म्हटलं जात आहे.

====================================================

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...