• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Indian Idol Marathi ची अँकर ठरली; ही अभिनेत्री करणार सूत्रसंचालन

Indian Idol Marathi ची अँकर ठरली; ही अभिनेत्री करणार सूत्रसंचालन

या प्रसिद्ध गायिकेची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री Indian Idol Marathiचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 नोव्हेंबर : 2004मध्ये सोनी वाहिनीवर ‘इंडिया आयडॉल’ (India Idol) या हिंदी रियॅलिटी शो ची सुरुवात झाली होती. तेव्हापासून या कार्यक्रमाचे सलग 12 पर्व पार पडली आहेत. या हिंदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. नव्या प्रतिभेला संधी देणं आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या मंचाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. याचेच एक पुढचे पाऊल म्हणजे हा शो आता मराठीतही (Indian Idol Marathi) येणार आहे. याची सुरूवात 22 नोव्हेंबरपासून होत आहे. या शोचे परीक्षक म्हणून अजय आणि अतुल ही संगीत क्षेत्रातील जोडी काम पाहणार आहे. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती या शोचा अ‍ॅंकर कोण असणार याची. मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री (swanandi tikekar)  या शोची सूत्रसंचालन करताना दिसणार आहे, सोनी मराठीवर नुकताच एक प्रमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये स्वानंदी टिकेकर दिसत आहे. सोनी मराठी वाहिनीने हा प्रोमे प्रदर्शिक करत म्हटलं आहे की, सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार स्वानंदी टिकेकर!अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा! 22 नोव्हेंबरपासून,आपल्या सोनी मराठीवर.
  कोण आहे स्वानंदी टिकेकर ? स्वानंदी टिकेकरला आपण एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतो. मात्र स्वानंदी एक उत्तम गायिका देखील आहे. तिला गाण्याचा वारसा हा तिच्या आईकडून म्हणजेच आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून मिळाला आहे. तर अभिनयाचा वारसा वडिलांकडून मिळाला आहे. तिचे वडील म्हणजे उदय टिकेकर. वाचा : येऊ कशी तशी मी नांदायला' मध्ये शकू मावशीची जागा घेतील या अभिनेत्रीने? उदय यांना आपण त्यांच्या अनेक भूमिकांसाठी ओळखतो. प्रामुख्याने त्यांनी केलेल्या भूमिका या खलनायिकी प्रवृत्तीकडे झुकणाऱ्या असल्या तरीही, त्यांच्या सकारात्मक भूमिकाही गाजल्या आहेत. स्वानंदि ही सुद्धा गायनाकडे वळण्याअगोदर आपल्याला अभिनेत्री म्हणून परिचित झाली ती, दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. स्वानंदीने सिंगिंग स्टार या शोमधून गायिकेला सुरूवात केली त्यानंतर तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. वाचा : सारा-जान्हवीची केदारनाथ तीर्थयात्रा सोशल मीडियावर हिट; फोटो व्हायरल स्वानंदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे व्हिडीओ फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक लूक तिच्या चाहत्यांसाठी खास असायचा.
  मात्र अलीकडे  स्वानंदीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.  तिच्या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्यानंतर आता स्वानंदी नव्या शोमध्ये दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: