Home /News /entertainment /

मराठीतील लोकप्रिय संगीतकारानं घेतली ड्रीम बाइक, किंमत ऐकून डोक्याला लावाल हात!

मराठीतील लोकप्रिय संगीतकारानं घेतली ड्रीम बाइक, किंमत ऐकून डोक्याला लावाल हात!

आता एका लोकप्रिय संगीतकाराला तसं पाहाता एक गाडी घेणं अवघडं नाही. पण शेवटी स्वप्न स्वप्न असतं. त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे.

  मुंबई, 16 जून- 'अजय-अतुल' या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार संगीत महाराष्ट्राला दिली आहेत. सध्या संगीत क्षेत्रातील ही लोकप्रिय जोडी 'इंडियन आयडल - मराठी' या शोचं परीक्षक (Indian Idol Marathi judge  ) म्हणून काम पाहातान दिसत आहे. नुकतीच अतुलनं चाहत्यांसोबत एक आनंदाची गोष्ट शेअर केली आहे. प्रत्येकाचं काहीना काही स्वप्न असतं. तसं अतुलचं  ( Atul Gogavale ) देखील होतं. त्याला त्याच्या स्वप्नातील एक गाडी घ्यायची होती. आता एका लोकप्रिय संगीतकाराला तसं पाहाता एक गाडी घेणं अवघडं नाही. पण शेवटी स्वप्न स्वप्न असतं. त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. अतुलनं त्याच्या स्वप्नातील बाईक घेतली आहे. आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अतुलनं त्याच्या इन्स्टाला एक व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या नवीन बाईकबद्दल माहिती दिली आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील दिसत आहे. बाईकच्या शोरूममधून त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ड्रीम बाइकला पाहिल्यावरचा आनंद दिसत आहे. त्याने म्हटलं आहे की, मी माझ्या स्वप्नातील bike BMW R1250 GS ही बाइक घेतली आहे. आणि मला एकचं सांगाचे आहे ही खूपच बेस्ट आहे..अशा शब्दात त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आहे. वाचा-अभिनेत्री साई पल्लवीचे काश्मिरी पंडितांबाबत खळबळजनक वक्तव्य,नव्या वादाला सुरुवात बीएमडब्ल्यू R1250 GS अॅडव्हेंचर प्रो या बाइकची किंमत किंमत २२ लाखांपर्यंत आहे. ही बाईक कंपनीनं 2018 मध्ये भारतात लाँच केली आहे. R 1250 GS रेंजच्या मॉडेलमध्ये कंपनीने अनेक शानदार अपडेट दिले आहेत.या बाइकमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स आहेत. स्टँडर्ड रायडिंग मोड्सशिवाय या बाइकमध्ये प्रो रायडिंग मोड देखील आहे.
  सध्या मराठीतील अनेक कलाकारांचा नवीन घर, चारचाकी तसेच बाईक घेण्यावर भर वाढल्याचा दिसत आहे. कोरोनामुळं मागील दोन वर्षात मनोरंजन विश्व ठप्प होतं. आता मात्र सगळं सुरळीत सुरू झालं आहे. सर्वांच्या हाताला काम मिळालं आहे. त्यामुळे अनेक कलाकार नवीन वस्तू खरेदीवर भर देताना दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या