मुंबई, 9 नोव्हेंबर- ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol Marathi) मराठीची सुरूवात 22 नोव्हेंबरपासून होत आहे. या शोचे परीक्षक म्हणून अजय आणि अतुल ही संगीत क्षेत्रातील जोडी काम पाहणार आहे. तर मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (swanandi tikekar) या शोची सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर ‘इंडियन आयडॉल’ चा मी हाय कोळी..हा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रेक्षकांना देखील हा प्रोमो खूपच भावल आहे. हा प्रोमो कसा चित्रीत झाला याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
सोनी मराठी वाहिनीने - ‘इंडियन आयडॉल’ चा फर्स्ट प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की,असा चित्रित झाला 'इंडियन आयडल मराठी' चा प्रोमो!'इंडियन आयडल मराठी'!अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!22 नोव्हेंबरपासून, सोम.-मंगळ., रात्री 9 वा.आपल्या सोनी मराठीवर. या प्रोमो मागची काहाणी या शोचे दिग्दर्शक, डीओपी महेश लिमये यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचा : माझा होशील ना मालिकेतील अभिनेत्रीला मंदिर प्रवेश नाकारला
कोळी वाल्याचा नंदू कसा ‘इंडियन आयडॉल’ मुळे सुपरस्टार होतो. लोक कसं त्याला ओळखतात, हा सगळा प्रवास या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याचे महेश लिमये यांनी सांगितलं. तसंच हा मंच देखील या स्पर्धकांना त्यांच्या जवळचं जे टॅलेंट आहे त्याच्यावरच मोठं करणार असल्याचे सांगितलं. हा प्रोमो कशाप्रकारे शुट झाला ..या प्रोमो मागचा विचार यावेळी महेश लिमये यांनी सांगितलं आहे. देवळात गाणारा नंदू ते इंडियन आयडॉलचा मंच त्यातून मिळालेली ओळख हा सगळा विचार महेश यांनी यावेळी सांगितला.
View this post on Instagram
2004मध्ये सोनी वाहिनीवर ‘इंडियन आयडॉल’ (India Idol) या हिंदी रियॅलिटी शो ची सुरुवात झाली होती. तेव्हापासून या कार्यक्रमाचे सलग 12 पर्व पार पडली आहेत. या हिंदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. नव्या प्रतिभेला संधी देणं आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या मंचाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. याचेच एक पुढचे पाऊल म्हणजे हा शो आता मराठीतही (Indian Idol Marathi) येणार आहे. याची सुरूवात 22 नोव्हेंबरपासून होत आहे. आता हा शो सुरू होण्यास अवघ्ये काही दिवस राहिली आहेत. प्रेक्षकांच्या मनात या शोबद्दल उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Indian idol, Marathi entertainment, TV serials