नुकताच इन्स्टाग्रामवर पवनदीप आणि अरुणिता कांजीलाल यांनी एक लाइव्ह सेशन केलं होतं. यामध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांना आपण KBC अर्थातच ‘कौन बनेगा करोडपती 13’ मध्ये हजेरी लावणार असल्याचं सांगितलं. यावेळी फक्त पवन आणि अरुणिताचं नव्हे तर इंडियन आयडॉल 12चे इतर स्पर्धकही उपस्थित असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्वांना साथ देण्यासाठी आणि भरभरून मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि फराह खानसुद्धा उपस्थित असणार आहेत. (हे वाचा:धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपये केले लंपास) लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने KBC मध्ये या कलाकारांचा सोहळा रंगणार आहे. या सर्व कलाकारांसोबत बिग बी अमिताभ बच्चन मोठी धम्माल करताना दिसून येणार आहेत. इंडियन आयडॉलमध्ये अरुणिता आणि पवनदीपमध्ये प्रेमाचं नातं फुलत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ही लव्हस्टोरी प्रेक्षकांनासुद्धा पसंत पडली होती. मात्र पाहायला गेलं तर ते फक्त मनोरंजनासाठी होतं ते दोघे फक्त एक चांगले मित्र आहेत. असं वारंवार स्पष्ट करण्यात आलं आह. मात्र सिझन संपल्यानंतरसुद्धा दोघांना सतत एकत्र पाहण्यात येत आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.