Home /News /entertainment /

TRP साठी नवा ड्रामा; Indian Idol नं सायली कांबळेच्या पालकांना करायला लावलं भलतंच काम

TRP साठी नवा ड्रामा; Indian Idol नं सायली कांबळेच्या पालकांना करायला लावलं भलतंच काम

‘TRP साठी तुम्ही काहीही करणार का?’ सायली कांबळेच्या पालकांसोबत केलेल्या या प्रकारामुळं प्रेक्षक इंडयन आयडलवर संतापले

  मुंबई 22 मे: इंडियन आयडल (Indian Idol 12) हा कधीकाळी छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय संगीत शो म्हणून ओळखला जायचा. देशभरातील एकापेक्षा एक गायक या शोमध्ये भाग घेऊन आपलं नशीब आजमावून पाहात होते. यापैकी अनेकांना प्रसिद्धी, पैसा आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. परंतु गेल्या काळात इंडियन आयडलची लोकप्रियता कमालीची ढासळू लागली आहे. या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या ड्रामेबाजीमुळं प्रेक्षक संतापले आहेत. मात्र असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा या शोमध्ये दाखवला गेला. इंडियन आयडलचं 12 वं पर्व सध्या सुरु आहे. (Indian Idol 12) यामधील एका भागात विशेष पाहुणे म्हणून अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांना बोलावण्यात आलं होतं. (Kumar Sanu and Anuradha Paudwal) दरम्यान या सेलिब्रिटींच्या मदतीनं स्पर्धक सायली कांबळेच्या पालकांसोबत मेकर्सनं असं काही केलं की ज्यामुळं त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. याचा व्हिडीओ सोनी वाहिनीनं इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. बॉलिवूडला आणखी एक धक्का; 'मैने प्यार किया'चे संगीतकार 'राम-लक्ष्मण' यांचं निधन
  या व्हिडीओमध्ये कुमार सानू सायलीच्या आईला विचारताना दिसतात की, हा रोमँटिक भाग सुरू आहे, तर मग तुमचे मिस्टरही रोमँटिक आहेत की नाही? त्यावर सायलीची आई उत्तर देते की अजिबात नाही. यावर सायली आपल्या वडिलांची बाजू घेत म्हणते की ते खूप रोमँटिक आहेत. कुमार सानू सायलीच्या आईला विचारतात, की त्यांनी तुम्हांला कधी डेटवर नेले की नाही? सायलीची आई नाही असे उत्तर देते. त्यावर कुमार सानू त्यांना सांगतात की, आज इथे तुमच्यासाठी कँडल लाईट डिनर आयोजित केलं आहे. तुम्हा दोघांची डेट इथेच आहे. हे दोघे रोमान्स करणार आणि मी गाणं गाणार. मग दोघांसाठी स्टेजवरच एक डिनर डेट आयोजिक केली जाते. या व्हिडीओवर सध्या टीकेचा वर्षाव होत आहे. गाणी दाखवायचं सोडून तुम्ही हे काय दाखवत आहात? असा सवाल प्रेक्षक वारंवार करत आहेत. खरं तर इंडियन आयडलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी खोट्या असतात. स्पर्धकांची गरीबी, परिक्षकांचं रडणं, पालंकांच्या समस्या एवढंच काय तर विशेष पाहुण्यांनी केलेली स्तुती देखील खोटी असते. त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. असं वारंवार याच शोमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर पालकांची सुरु असलेली डेटिंग नाईट पाहून प्रेक्षक संतापले आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Indian idol, Song

  पुढील बातम्या