मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Indian Idol' फेम सवाई भट्टची झाली अशी अवस्था; प्रसिद्धी नंतरही नाही बदललं आयुष्य

'Indian Idol' फेम सवाई भट्टची झाली अशी अवस्था; प्रसिद्धी नंतरही नाही बदललं आयुष्य

  'इंडियन आयडॉल' हा एक असा रिऍलिटी शो आहे. ज्याचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच इंडियन आयडॉल या शो चा १२ वा    (Indian Idol 12)   सीजन पार पडला. यामध्ये स्पर्धक पवनदीप राजन हा विजेता ठरला होता. या शोच्या प्रत्येक स्पर्धकाला एक खास ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक म्हणजे राजस्थानमधील सवाई भट्ट होय.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 5 डिसेंबर-   'इंडियन आयडॉल' हा एक असा रिऍलिटी शो आहे. ज्याचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच इंडियन आयडॉल या शो चा १२ वा    (Indian Idol 12)   सीजन पार पडला. यामध्ये स्पर्धक पवनदीप राजन हा विजेता ठरला होता. या शोच्या प्रत्येक स्पर्धकाला एक खास ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक म्हणजे राजस्थानमधील सवाई भट्ट होय. मात्र या शो नंतरसुद्धा सवाई भट्टची   (Savai Bhatt)  अवस्था 'जैसे थे' अशीच आहे.
View this post on Instagram

A post shared by Sawai Bhatt (@sawai.bhatt)

इंडियन आयडॉल १२ हा शो जितका विवादित राहिला तितकाच तो लोकप्रियसुद्धा झाला होता. लोकप्रियतेमुळे हा सीजन जास्त महिने सुरु ठेवण्यात आला होता. या शोमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, अंजली गायकवाड, निहाल तौरो, आशिष कुलकर्णी, शण्मुखप्रिया आणि सवाई भट्ट यांना खास ओळख मिळाली होती. हे सर्व स्पर्धक जवजवळ शोच्या शेवट्पर्यंत टिकून होते. त्यांनतर ग्रँड फिनालेच्या काही दिवसांआधी यातील काही स्पर्धक बाहेर गेले होते. मात्र तोपर्यंत संपूर्ण जगात यांनी आपल्या आवाजाचा जादू पसरवला होता.
View this post on Instagram

A post shared by Sawai Bhatt (@sawai.bhatt)

सध्या यातील अनेक स्पर्धक मोठमोठ्या प्रोजेक्टसमध्ये काम करत आहेत. पवनदीप, अरुणिता, सायली, आशिष, दानिश या स्पर्धकांना शो नंतर अनेक शो आणि लाईव्ह कॉन्सर्ट मिळाले आहेत. इतकंच नव्हे तर सायली, पवनदीप, दानिश आणि अरुणिता सध्या युकेच्या दौऱ्यावर आहेत. हे स्पर्धक चक्क युकेमध्ये आपले लाईव्ह शो करत आहेत. त्यामुळे यांना चांगलंच स्टारडम मिळालं आहे. ते सतत चर्चेत आहेत. बऱ्यापैकी त्यांची लाइफस्टाइलसुद्धा बदलली आहे. ते सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतात. तसेच हे स्पर्धक पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत विदेशातच राहणार आहेत. तसेच काही दिवसानंतर शन्मुखप्रिया आणि निहालसुद्धा त्यांना जॉईन करणार आहेत. अशी आहे सवाई भट्टची अवस्था- मात्र यातील एक स्पर्धक सवाई भट्ट त्याची अस्वथ मात्र अजूनही सुधारलेली नाहीय. तो अजूनही गरिबीत आयुष्य जगत आहे. या शोमुळे सवाईला सुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सवाईने आपल्या खणखणीत आवाजाने रसिक श्रोत्यांच्या मनात एक खास स्थान बनवलं आहे. या शोमधून सर्वांनाच सवाई भट्टच्या टॅलेंटच दर्शन झालं होतं. मात्र इतक्या लोकप्रियतेनंतरही सवाई आज एक अत्यंत बिकट अवस्थेत आयुष्य जगत आहे. शो नंतरसुद्धा सवाईच्या परिस्थिती बदल झालेला दिसून येत नाहीय. हिंदुस्थानने दिलेल्या न्यूजनुसार, आजही सवाई फारच हलाखीत आयुष्य काढत आहे. या शो आधीही सवाई असंच आयुष्य जगत होता. हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र या शो नंतर आणि त्याला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर सवाईच आयुष्य बदलून जाईल किंवा त्याच्या परिस्थिती सुधार होईल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र असं नाही झालं त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. शो पूर्वी असं होतं सवाई भट्टचं आयुष्य- सवाई भट्टने आपल्या खणखणीत आवाजाने संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. मात्र सवाई हा शो मध्ये येण्यापूर्वी गावागावात जाऊन आपलं पॉट भरत होता. सवाई हा हा राजस्थानमधील एका छोट्याशा गावातील रहिवाशी आहे. तो या शोपूर्वी गावागावात जाऊन कठपुतलीचं शो करत होता. मात्र त्यातूनही त्याला जेमतेम पैसे मिळत होते. कारण आजकाल ही कला लुप्त होत आहे. आधुनिक जगात हे शू आता दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे इतकं करूनही त्याला आपल्या कुटुंबाच पोट भरणं कठीण होत होतं. असं म्हटलं जातं कि त्यानं ए राजस्थान सरकारकडे मदत मागितली होती. मात्र त्याला आद्यपही कोणतीच मदत मिळाली नाही.
First published:

Tags: Entertainment, Indian idol

पुढील बातम्या