जोई राजन म्हणाले, 'सायली कांबळे (Sayli Kamble) ही एक गुणवान गायिका (Talented Singer) आहे. इंडियन आयडॉल कार्यक्रमात मी तिचं गायन ऐकलं आणि मी तिच्या आवाजाचा जणू फॅनच झालो. तिने आपल्या गाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांची मनं जिंकली आहेत. ती एक सुरेल आणि यशस्वी गायिका म्हणून प्रसिद्ध होईल, असा विश्वास वाटतो. तसंच, 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटासाठी तिने गायलेलं गाणंही लोकांना नक्की आवडेल.' (हे वाचा:BoyCottRadhikaApte' ट्रेंड होताच; मदतीसाठी पुढे सरसावला सहकलाकार ) इंडियन आयडॉलचं 12 पर्व सुरू असताना 'भारत की बेटी' म्हणून सायली कांबळे प्रसिद्ध झाली होती. संपूर्ण सीझनदरम्यान पवनदीप, दानिश, अरुणिता, षण्मुखप्रिया या कलाकारांना अनेक संगीतकारांनी त्यांच्या चित्रपटांतली गाणी गाण्याची संधी दिली. त्या बाबतीत सायली काहीशी अनलकी ठरली. कारण तिला यातली संधी मिळाली नाही; मात्र आपण केलेलं काम, मेहनत वाया जात नाही, या उक्तीप्रमाणे तिचं नशीब कार्यक्रम संपल्या संपल्या लगेचच उजळलं. 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटाचे निर्माते जोई राजन यांना तिचं गाणं आवडलेलं असल्यानं त्यांनी तिला त्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत तिचा प्रवेश झाला आहे. त्याबद्दल ती खूप खूश आहे. (हे वाचा:सई-ललितचं 'पेट पुराण'; चित्रपटाच्या शुटींगला झाली सुरुवात ) 'इंडियन आयडॉलमध्ये सहभागी होताना माझी अशी इच्छा होती, की लोकांना माझं गायन आवडू दे आणि चित्रपटसृष्टीत माझ्या करिअरची सुरुवात होऊ दे. त्यामुळे मी स्वतःला खूप सुदैवी मानते. इंडियन आयडॉलची ग्रँड फिनाले संपल्या संपल्या दुसऱ्याच दिवशी जोई राजन सरांनी मला 'कोल्हापूर डायरीज'साठी गाण्याची संधी दिली. त्यामुळे मी जोई राजन सर आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांची मनापासून आभारी आहे,' अशी प्रतिक्रिया सायली कांबळे हिने व्यक्त केली. अभिनेता भूषण पाटील (Bhushan Patil) आणि अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) यांच्या 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.'INDIAN IDOL' SINGER RECORDS SONG FOR FILM... #SayliKamble - second runner-up of #IndianIdol12 - recorded her first song for #Marathi film #KolhapurDairies... Composed by #AvadhootGupte... Directed by #JoeRajan... #KolhapurDairies is remake of #Malayalam film #AngamalyDairies. pic.twitter.com/7Bx91FXF9v
— taran adarsh (@taran_adarsh) August 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian idol