मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Indian Idol 12: पवनदीप-अरुणीताची केमिस्ट्री वाढणार? एकाच बिल्डींगमध्ये घेतलं घर

Indian Idol 12: पवनदीप-अरुणीताची केमिस्ट्री वाढणार? एकाच बिल्डींगमध्ये घेतलं घर

पवनदीप आणि अरुणीताने आता एकाच बिल्डिंगमध्ये मुंबईत घर घेतल्याची बातमी येत आहे. अरुणीता मुंबईत राहते. तर तिच्याच अपार्टमेंटमध्ये पनवदीपनेही घर घेतलं आहे.

  • Published by:  News Digital
मुंबई 21 ऑगस्ट : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा सीझन नुकताच संपला आहे. सुरेल स्पर्धक आणि तितकीच धम्माल या सीझनला पाहायला मिळाली. पवनदीप राजन (Pawandeep Rajan) हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्याची संपूर्ण पर्वात देखील विशेष चर्चा रंगली होती. आपल्या आवजाइतकाच तो त्याच्या इतर स्पर्धकांसोबत असलेल्या कनेक्शनमुळेही चर्चेत राहिला. अरुणीता कांजीलाल (Arunita Kanjilal) सोबत त्याची मैत्री विशेष चर्चेत राहिली. पवनदीप आणि अरुणीताने आता एकाच बिल्डिंगमध्ये मुंबईत घर घेतल्याची बातमी येत आहे. अरुणीता मुंबईत राहते. तर तिच्याच अपार्टमेंटमध्ये पनवदीपनेही घर घेतलं आहे. याची माहिती स्वतः पवनदीपनेच दिली आहे. त्यामुळे ते दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘इंडियन आयडॉल 12’च्या संपूर्ण सीझनमध्ये त्यांच्या अफेअरचीही चर्चा रंगली होती. शो मध्ये त्यांची कहानी आणखीनच रंगवून दाखवण्यात आली होती.

HBD: ‘तेरे नाम’ फेम अभिनेत्री भूमिका चावलाला सोडावं लागलं बॉलिवूड

दरम्यान आम्हा दोघांमध्ये केवळ चांगली मैत्री असल्याचं पवनदीपने एका मुलाखतीत सांगतिलं होतं. पण आता त्या दोघांनी एकाच बिल्डींगमध्ये घर घेतल्याने ते चर्चेत आहे. पण केवळ पवनदीपनेच नाही तर शोमधील तर स्पर्धकांनीही याच बिल्डींगमध्ये घर घेतलं आहे. स्पर्धेतील कन्टेस्टंट मोहम्मद दानिषने (Mohammad Danish) सांगतिलं की, पवनदीप शिवाय इतर स्पर्धक देखील तिथेच घर घेण्याचा विचार करत आहेत. त्यांचा हा देखील प्लॅन आहे की, एकत्र स्टुडीओ उभारायचा आहे. आणि एकत्र गाणी गायची.

देवमाणूस सध्या काय करतोय? फौजी वेशात नव्या भूमिकेसाठी सज्ज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

यामुळे शोच्या स्पर्धकांची मैत्री आता आणखीनच घट्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर इतर शहरांतून आलेल्या या स्पर्धकांनी मुंबईतच घर घेऊन एकत्र करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.
First published:

Tags: Entertainment, Indian idol, Tv shows

पुढील बातम्या