मुंबई, 30 मार्च: Indian Idol 12 हा रिअॅलिटी शो आतापर्यंत अनेक वेळा वादात सापडला आहे. या वेळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि निमित्त आहे नचिकेत लेलेचं (Nachiket Lele singer elimination) एलिमिनेशन. नचिकेत लेले हा मराठमोळा गायक, परफॉर्मर कमी मतं मिळाल्याने शेवटच्या तीनात राहिला आणि आता तो या शोमधून बाहेर फेकला गेला आहे. यानंतर नचिकेतच्या फॅन्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. काहींनी उघडपणे परीक्षक आणि शोचे निर्माते पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. Sony TV वर सुरू असणाऱ्या या शोमध्ये कोण जिंकणार हे आधीच फिक्स झालं असल्याचे आरोप काही प्रेक्षकांनी केले आहेत आणि तसे ट्वीट्ससुद्धा केले आहेत.
We're going to miss you #IdolNachiket! Share your love for this talented artist in the tweets and tell him how much we love him! #IndianIdol2020 @iAmNehaKakkar @VishalDadlani #HimeshReshammiya #AdityaNarayan @FremantleIndia @Nachiketlele1 pic.twitter.com/EKgHo87k4O
— sonytv (@SonyTV) March 28, 2021
#indianidol I have no clue what your team is upto. You guys just lost a gem #nachiketlele from your show and you guys are giving so much of hype to #SawaiBhatt afterall he is not a versatile singer and have done so many mistakes.
— Dhruv Sareen (@Dv_sareen) March 29, 2021
डोंबिवलीच्या नचिकेत लेलेने यापूर्वी झी मराठीच्या सारेगमप या शोमध्ये भाग घेतला होता आणि ती स्पर्धा जिंकलीही होती. हरहुन्नरी गायक परफॉर्मर म्हणून तो ओळखला जातो. त्याच्या गायकीतही मराठी नाट्यसंगीताची छाप आहे. नचिकेतने बाई आणि पुरुषाच्या आवाजात गायलेल्या गाण्याला विशेष दाद मिळाली होती. त्यावर प्रेक्षक फिदा होते. नचिकेतलाच या स्पर्धेतून पायउतार व्हावं लागल्याने अनेक प्रेक्षकांना धक्का बसला आहे. मात्र एक VIDEO शेअर करत आपल्या तमाम चाहत्यांना एक संदेश दिला आहे.
‘इंडियन आयडॉल 12’ मध्ये देशाच्या प्रत्येक राज्यातून तरुण मुलं-मुली आपल्या आवाजाचा ठसा उमटवत आहेत. या कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या गुणांसोबतचं दर्शकांचे मतसुद्धा महत्वाचं असतं. आणि ज्या स्पर्धकाला परीक्षक आणि दर्शक असे मिळून सर्वांत कमी गुण मिळतात, त्याला कार्यक्रमातून निरोप घ्यावा लागतो. असचं काहीसं झालं नचिकेत लेले याच्यासोबत. रविवारी प्रक्षेपित झालेल्या भागात नचिकेतला कमी गुण मिळाल्याने बाहेर जावं लागलं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठं दुःख झालं आहे.
कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या आपल्या चाहत्यांसाठी आणि कार्यक्रमांच्या टीम साठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
'माझ्या मुलीने मला मार खाताना पाहिलंय',मोडलेल्या 2 लग्नांबाबत श्वेतानं सोडलं मौन
सोशल मीडियावर व्हिडीओ द्वारे नचिकेतने एक संदेशसुद्धा दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.
View this post on Instagram
याव्हिडीओमध्ये नचिकेतनं आपला इंडियन आयडॉलसोबतचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे. तसेच तो म्हणतो, की या कार्यक्रमात आल्यानंतर स्पर्धकाच्या फक्त आवाजात सुधारणा होतं नाही. तर त्या स्पर्धकाचं संपूर्ण व्यक्तिमत्वचं बदलतं. यामध्ये नचिकेतनं आपल्या परीक्षकांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आणि त्यांच्यापासून ज्या-ज्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्यांना आयुष्यात पुढे घेऊन जाणार असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
याबरोबरच नचिकेतनं कार्यक्रमाच्या कॅमेरा टीमपासून सेटवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचसाठी आभार व्यक्तं केलं आहे. त्याचबरोबर आपल्या सह-गायकांचं देखील आभार मानलं आहे. आणि पुढे नचिकेतनं म्हटलं आहे. की आत्ता तर हा प्रवास सुरु झाला आहे. अजून पुढे खूप कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचंही तो म्हणाला. तसेच आत्ता तर अजिबातचं थांबणार नसल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
(हे वाचा: बॉलीवूडमध्ये अशी साजरी केली जाते होळी, हे वर्ष होतं अपवाद! Throwback PICS)
नचिकेत लेले हा महाराष्ट्रातील स्पर्धक आहे. तो गायनासोबतचं मराठी रंगमंचावरसुद्धा काम करतो. त्यानं इंडियन आयडॉलमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या वेशात आपलं गाणं सादर केलं आहे. या कार्यक्रमाच्यावेळी मराठी अभिनेता सुबोध भावेसुद्धा त्याला भेटण्यासाठी आला होता. त्यानं ‘बालगंधर्व’ च्या वेशात केलेलं सादरीकरण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं आहे. नचिकेतनं आपल्या आवाजातून आणि अभिनयातून प्रेक्षकांना चांगलीचं भुरळ पाडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India