Indian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प?

Indian Idol च्या स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं केलं KISS, इतर परीक्षक का होते गप्प?

नेहा कक्करसोबत घडलेल्या या प्रकारानं सोशल मीडियावर बरीच खळबळ माजली होती.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : रिअलिटी शो 'इंडियन आयडॉल'चा 11 वा सीझन लवकरच सुरू होत आहे. यावेळी या शोमध्ये नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर आदित्य नारायण या शोचं होस्टिंग करणार आहे. सध्या या शोची ऑडिशन सुरू असून काही दिवसांपूर्वी या ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला होता.

नेहा कक्करसोबत घडलेल्या या प्रकारानं सोशल मीडियावर बरीच खळबळ माजली होती. खासकरुन जेव्हा हे सर्व घडलं त्यावेळी दोन्ही परिक्षक मंचावर होते मात्र त्यावेळी त्यांनीही त्यावेळी गप्प राहणं पसंत केलं. पण त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर होता. एका युजरनं विशालला याबाबत ट्वीटरवर विचारलं. त्यामुळे आता परिक्षक विशाल ददलानी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता नील नितिन मुकेशचा मुलीसोबत क्यूट डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

चाहत्यानं विशालला म्हटलं, मला खात्री आहे की तुम्ही त्या स्पर्धकाला सहजासहजी अजिबात सोडलं नसेल. तुम्ही करतर त्याला मार द्यायला हवा होता. ज्यामुळे तो पुन्हा असं काहीतरी करण्याची पुन्हा हिंमत करणार नाही. चाहत्याच्या या ट्वीटला विशालनं रिप्लाय केला आहे. त्यानं लिहिलं, मी पोलिसांना बोलवण्याचा सल्ला दिला होता मात्र नेहानं त्याला जाऊ दिलं. त्याला मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही त्याची मदत नक्की करु.

सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये सर्व स्पर्धकांच्या ऑडिशनची झलक पाहायला मिळाली. सर्व स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर परिक्षक खूप खूश होते. पण व्हिडीओच्या शेवटी एक स्पर्धक खूप सारे गिफ्ट घेऊन पोहोचला. हे सर्व गिफ्ट नेहाला दिले. नेहा त्यावर खूश होऊन त्याला मिठी मारली. पण एवढ्यात तो नेहाला गालावर किस केलं. शो होस्ट आदित्य नारायण त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण इतक्यात नेहा लगेचच तिथून बाजूला झाली. या घटनेमुळे दुसरे परिक्षकही हैराण झालेले दिसले. आता मात्र हा व्हिडीओ सोनी टीव्हीनं डिलीट केला आहे.

या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि त्यानंतर या स्पर्धकाला शिक्षा देण्याची मागणी सर्वांनी केली होती. नेहा कक्कर बॉलिवूडची एक प्रसिद्ध गायिका आहे. बॉलिवूडमध्ये हिट रिमिक्स गाणी गाऊन नेहानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पॉप सिंगर लेडी गागानं ट्वीट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर खळबळ!

==================================================================

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

First published: October 21, 2019, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading