Indian Idol च्या सेटवर ढसाढसा रडला हिमेश रेशमिया, कारण वाचून व्हाल हैराण

ग्रँड फिनालेच्या वेळी असं काही झालं ज्यामुळे हिमेशला रडू कोसळलं. एवढंच नाही तर विशाल ददलानीलाही त्याच्या भावना रोखता आल्या नाहीत.

ग्रँड फिनालेच्या वेळी असं काही झालं ज्यामुळे हिमेशला रडू कोसळलं. एवढंच नाही तर विशाल ददलानीलाही त्याच्या भावना रोखता आल्या नाहीत.

  • Share this:
    मुंबई, 23 फेब्रुवारी : लोकप्रिय टीव्ही रिअलिटी शोचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच 23 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाचा हा सीझन प्रमाणापेक्षा जास्तच लोकप्रिय ठरला. प्रत्येक स्पर्धकानं आपल्या सुरेल आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली. याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला ज्यात सहसा कधीच भावुक न होणारा हिमेश रेशमिया एक गाणं ऐकून ढसाढसा रडताना दिसत आहे. हिमेश रेशमिया कोणत्याही शोमध्ये सहसा भावुक होत नाही. त्यानं आतापर्यंत स्वतःची अशी प्रतिमा तयार केली आहे की एखाद्या स्पर्धकाच्या गाण्यासाठी त्याचं उठून उभ राहणं सुद्धा खूप मोठी गोष्ट मानली जाते. पण या सीझनमध्ये तो अनेकदा स्पर्धकांसोबत गातानाही दिसला. पण ग्रँड फिनालेच्या वेळी असं काही झालं ज्यामुळे हिमेशला रडू कोसळलं. एवढंच नाही तर विशाल ददलानीलाही त्याच्या भावना रोखता आल्या नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हिमेश रडताना दिसत आहे. इंडियन आयडॉलच्या ग्रँड फिनालेसाठी टॉप 5 मध्ये सामील झालेल्या अंकोना मुखर्जीनं हिमेशनं कंपोज केलेलं ‘तेरी मेरी कहाणी’ हे गाणं गायलं. हे गाणं ऐकल्यावर हिमेश खुपच भावुक झाला आणि अचानक ढसाढसा रडू लागला. हिमेशला असं रडताना पाहून जज विशाल ददलानी आणि नेहा कक्कर यांनी त्याला आधार दिला.
    हिमेशनं कंपोज केलेलं तेरी मेरी कहाणी हे गाणं व्हायरल सेन्सेशन रानू मंडल यांनी गायलं होतं. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेशनं त्यांना त्याच्या गाण्यासाठी संधी दिली आणि रानू रातोरात स्टार झाल्या होत्या. हे गाणं हिमेशच्या हॅप्पी हार्डी अँड हिर या सिनेमातील आहे. या सिनेमात रानू यांनी एक-दोन नाही तर तब्बल तीन गाणी गायली होती. जेव्हा रानू यांनी गायलेलं हे गाणं इंडियन आयडॉलमध्ये म्हटलं गेलं त्यावेळ हिमेश स्वतःच्या भावना रोखू शकला नाही. इंडियन आयडॉल 11 च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये भटिंडाचा सनी हिंदुस्तानी, महाराष्ट्राचा रोहित राऊत, कोलकाताचा अद्रिज घोष आणि अंकोना मुखर्जी, अमृतसरचा रिधम कल्याण यांचा समावेश आहे. आज रात्री यापैकी एक इंडियन आयडॉल 11 चा विजेता होणार आहे.
    First published: