...आणि भुकेलेल्या स्पर्धकाला Indian Idolच्या सेटवरच अनु मलिकनी खाऊ घातला डाळ-भात

...आणि भुकेलेल्या स्पर्धकाला Indian Idolच्या सेटवरच अनु मलिकनी खाऊ घातला डाळ-भात

Indian Idol च्या सेटवरील या स्पर्धकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सिंगिंग रिअलिटी शो 'इंडियन आयडॉल 11' चे परीक्षक अनु मलिक, विशाल ददलानी आणि नेहा कक्कर यांना सध्या सुरू असलेल्या ऑडिशन दरम्यान अनेका समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे या शोमध्ये एकपेक्षा एक चांगले गायक पोहोचत आहेत ज्यांच्या गाण्याला तोड नाही. तर दुसरीकडे असे काही गायक या ऑडिशनला पोहोचत आहेत. ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकावासाही वाटणार नाही आणि यासोबतच ते परीक्षकांची डोकदुखी बनत आहेत. पण या सेटवर नुकताच घडलेला एका किस्सा ऐकल्यावर तुम्हालाही हसावं की रडावं हेच समजणार नाही.

इंडियन आयडॉल 11 च्या सेटवर बेसुऱ्या आवाजात गाणं गाणाऱ्या काही स्पर्धकांव्यतिरिक्त काही असेही स्पर्धक आहेत ज्यांचं वागणं पाहिल्यावर त्यांच्या धाडसाची दाद द्यावी लागेल. या सेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात इंडियान आयडॉलचे परीक्षक विशाल ददलानी आणि अनु मलिक एका स्पर्धकाला चक्क जेवण भरवताना दिसत आहेत.

आर्चीच्या प्रेमातला गावरान परश्या बदलला, मेकओव्हरनंतरचा नवा लुक पाहिला का?

सुरुवातीला या स्पर्धकानं पाणी मागितलं आणि नंतर विशाल आणि अनु यांनी त्याला स्नॅक्स ऑफर केला. पण त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हीही चक्रावून जाल. Indian Idol च्या सेटवरील या स्पर्धकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या स्पर्धकाला स्नॅक्स ऑफर केल्यानंतर त्यानं तो अगदी हावरटासारखा खायला सुरुवात केली. त्याला असं खाताना पाहून अनु मलिक म्हणाले सर्व खाऊन टाक आम्हाला काहीही ठेऊ नकोस. त्यावर लाजून बाजूला होण्याऐवजी या स्पर्धकानं पुन्हा आणखी जलद खाण्यास सुरुवात केली. हे सर्व पाहिल्यावर नेहा कक्करनं त्याला विचारलं तू आणखी काही खाणार आहेस का? मिल्कशेक, पावभाजी. त्यावर तो गायक म्हणाला नाही मॅम फक्त डाळ-भात.

‘मारेंगे भी हम, बचाएंगे भी हम’, जबरदस्त अॅक्शनवाला सलमानचा चुलबुल पांडे अवतार

यानंतर या गायकासाठी अनु मलिक यांनी सेटच्या आयोजकांना सांगून डाळ-भात मागवला. त्यानंतर हे जेवण त्यांनी त्याला स्वतः नेऊन दिलं. तर विशाल आपल्या खुर्चीवरुन उठला आणि त्या स्पर्धकाला बसायला दिलं त्यावर त्यानं म्हटलं की तो परफॉर्मन्स नंतर हे खाणार आहे.

KBC 11: बायकोला मंगळसूत्र घेऊन देण्यासाठी तो पोहोचला हॉट सीटवर आणि....

त्यानंतर तो जेव्हा गाण्यासाठी पोहोचला तेव्हा त्यानं आधी डान्स केला आणि काही वेळानं त्यानं गायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच ठिकाणी बसून त्यानं डाळ-भात खायला सुरुवात केली. शेवटी अनु मलिक यांनी या स्पर्धकाला स्वतःच्या हातानं हे जेवण खाऊ घातलं आणि त्याला निरोप दिला.

==============================================

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:37 AM IST

ताज्या बातम्या