Indian Idol च्या स्पर्धकाच्या आवाजानं सर्वांना लावलं वेड, कहाणी ऐकून आनंद महिंद्रा भावुक

Indian Idol च्या स्पर्धकाच्या आवाजानं सर्वांना लावलं वेड, कहाणी ऐकून आनंद महिंद्रा भावुक

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवर इंडियन आयडॉलचा स्पर्धक सनीचा व्हिडीओ शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : सध्या छोट्या पडद्यावर रिअलिटी शोची चलती आहे. एकामागोमाग एक येत असलेले हे रिअलिटी शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रियही ठरत आहेत. लवकरच टीव्हीवरील मोस्ट पॉप्युलर सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडॉलचा 11 वा सीझन सुरू आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून या सीझनच्या ऑडिशनमुळे हा शो प्रचंड चर्चेत आहे. देशभरातून वेगवेगळे स्पर्धक या शोमध्ये सहभागी होत आहेत. अशात नुकत्याच झालेल्या एका ऑडिशनमध्ये एक असा स्पर्धक पोहोचला ज्याच्या आवाजानं सर्वांनाच वेड लावलं. या स्पर्धकाचं नाव होतं सनी. सनीनं ऑडिशन दरम्यान आपली कहाणी सांगितली. त्याची ही कहाणी आणि त्याचा आवाज ऐकल्यावर प्रेक्षकांसोबतच प्रसिद्ध बिझनेसमन आनंद महिंद्रा सुद्धा भावुक झालेले दिसले.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवर इंडियन आयडॉलचा स्पर्धक सनीचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सनी त्याची कहाणी सांगताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण रस्त्यावर बूट पॉलिशचं काम करत असल्याचं तर त्याची आई रस्त्यावर फिरून फुगे विकण्याचं काम करत असल्याचं सनीनं सांगितलं. आनंद महिंद्रा यांनी याबद्दल त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, दिवाळीची एक उत्तम संधी आहे जे पुढे जात आहेत त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याची. माझ्या एका मित्रानं मला हा व्हिडीओ पाठवला आणि सांगितलं की हे पाहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. युट्यूबवर याची पूर्ण लिंक शोधा आणि मी तुम्हाला चॅलेंज करतो तुमचे डोळेही पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. असं टॅलेंट शोधून टीव्ही आणि सोशल मीडियानं खूप चांगलं काम केलं आहे.

लग्नाविना मूल होणार असल्याने कल्की झाली ट्रोल, अशा शब्दांत व्यक्त केली खंत

आनंद महिंद्रा यांचं हे ट्विट इंडियन आयडॉल 11चे जज विशाल ददलानी यांनी रिट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘आनंद महिंद्रा सर मला खूप आनंद होत आहे की, तुम्ही हा व्हिडीओ पाहिला. सनीला नोटीस केलं येणारा एपिसोडही नक्की पाहा इंडियन आयडॉलच्या प्रत्येक स्पर्धकाकडे ती क्षमता आहे की ते देशातील प्रत्येक मुलाला प्रेरणा देतील. जर तुम्ही या शोच्या सेटवर येऊन स्पर्धकांशी संवाद साधाल तर आम्हाला आणखी आनंद होईल’

रिअल हिरो! ऐश्वर्याच्या मॅनेजरचा जीव वाचवणाऱ्या शाहरुखचं सलमाननं असं केलं कौतुक

सनी बद्दल बोलायचं तर त्यानं आता टॉप 15 स्पर्धकांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील गाण जसंच तसं गाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सनीनं आपल्या आवाजानं देशभरात आपले चाहते बनवले आहेत. सनीनं इंडियन आयडॉलचे परीक्षक नेहा कक्कर, अनु मलिक आणि विशाल ददलानी यांनी मनं जिंकली. त्याच्या कहाणी परीक्षकांना जेवढं भावुक केल नाही त्याहून कितीतरी पटींनी त्याच्या आवाज आणि टॅलेंटनं इम्प्रेस केलं आहे.

KBC 11 : अमिताभ बच्चन यांना सनबाथ घेताना पाहण्यासाठी फॅनची अजब युक्ती!

================================================================

VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 02:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading