याशिवाय या शोमध्ये आदित्य रॉय कपूरचं सिंगिंग स्किल पाहायला मिळालं. त्याला या मंचावर गाण्याची विनंती करण्यात आली आणि आदित्यनं गिटार घेऊन त्याचा सुपरहिट सिनेमा ‘आशिकी 2’मधील ‘मिलने है मुझसे आयी...’ हे गाणं गायलं. दिशा आणि आदित्य व्यतिरिक्त या शोमध्ये अभिनेता अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांनी देखील सर्व स्पर्धकांसोबत एन्जॉय केलं. मलंग सिनेमासाठी दिशा आणि आदित्य यांनी खुप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी दोघांनी अंडर वॉटर किसिंग सीनचे ट्रेनिंगही घेतले होते. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या एका दृश्यासाठी दिशा आणि आदित्य यांना एक मिनिटला पाण्याखाली रहावे लागले होते. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील पाहायला मिळाला. दिशा-आदित्यची सिझलिंग केमिस्ट्री आणि त्यातील मर्डर मिस्ट्री हे कॉम्बिनेशन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता अनिल कपूर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.
मोहित सूरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी एकत्र केली आहे. या चित्रपटात आदित्य, दिशा पाटनी व्यतिरिक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Disha patani