VIDEO : जगाचं लक्ष लागलेल्या World of Dance या शोचा 'किंग' ठरला मुंबईचा हा ग्रूप

VIDEO : जगाचं लक्ष लागलेल्या World of Dance या शोचा 'किंग' ठरला मुंबईचा हा ग्रूप

14 डान्सरर्सच्या या डान्स क्रूनं आपल्या दमदार डान्स परफॉर्मन्सनं परिक्षक जेनिफर लोपेझ, नेयो आणि डेरेक ह्यूग या तिघांचीही मनं जिंकत या शोचं विजेतेपद आपल्या नावे केलं.

  • Share this:

मुंबई, 7 मे : सध्या सर्वत्रच डान्स रिअ‍ॅलिटी शोची क्रेझ दिसते. नुकताच जगभरात 'वर्ल्ड डान्स डे' साजरा करण्यात आला आणि अशातच नुकतीच भारताला अभिमान वाटवा अशी एक घटना वर्ल्ड ऑफ डान्स या अमेरिकन रिअ‍ॅलिटी शोमध्ये घडली. मुंबईचा हिप हॉप डान्स क्रू 'द किंग' अमेरिकन डान्स रिअ‍ॅलिटी शो वर्ल्ड ऑफ डान्सचा विजेता ठरला. 14 डान्सर्सच्या या डान्स क्रूनं आपल्या दमदार डान्स परफॉर्मन्सनं परिक्षक जेनिफर लोपेझ, नेयो आणि डेरेक ह्यूग या तिघांचीही मनं जिंकत या शोचं विजेतेपद आपल्या नावे केलं. यासोबतच त्यांनी 1 मिलियन डॉलर म्हणजे 7 कोटी रुपयांचं पारितोषिक जिंकलं.
 

View this post on Instagram
 

Now this is the PROUDEST moment for all of us. Thank you @kings_united_india for putting INDIA on top of the world of DANCE. love you guys and proud of you. Yayyyy baby. @suresh_kingsunited let’s partyyyy.


A post shared by Remo Dsouza (@remodsouza) on

वर्ल्ड ऑफ डान्सचा सिझन फिनाले रविवार (5 मे)ला पार पडला. यामध्ये जगभरातील टॉप डान्स ग्रूपनी भाग घेतला होता. मात्र या सर्वांना मात देत मुंबईच्या 'द किंग'नं विजेतेपदावर आपलं नावं कोरलं आणि भारताची मान जगभरात उंचावली. या ग्रूपमध्ये सर्व मेंबर 17 ते 27 वयोगटातील आहेत. मागचे तीन महिने चाललेल्या या शोमध्ये सुरुवातीपासूनच दमदार परफॉर्मन्सनं 'द किंग'नं परिक्षकांसोबतच इतर सर्वांचीही मनं जिंकली. या ग्रूपच्या संघर्ष मुंबईतील स्ट्रीटवरून 2008मध्ये झाला होता. हा ग्रूप इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 3चा विजेता आहे. याशिवाय 2015मध्ये ते हिप हॉप डान्स चँपियनशिपमध्ये टॉप 3मध्येही होते. तसेच वरुण धवनाच्या 'ABCD 2' मध्येही त्यांनी काम केलं आहे.


हा डान्स शो जिंकल्यानंतर रेमो डिसोझासहित बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरुन या ग्रूपचं अभिनंदन केलं. या शोची सुरुवात 26 फेब्रुवारीला झाली होती. या शोसाठी जेनिफर लोपेझ, डेरेक ह्यूग, नेयो यांनी परिक्षक म्हणून काम पाहिलं. तर हा शो स्कॉट इवेन्स आणि जेना डेवान यांनी होस्ट केला.

प्रियांका चोप्राच्या 'मेट गाला लुक'वर नेटकरी सैराट, 'हे' भन्नाट मीम्स एकदा पाहाच

Met Gala प्रियांकाच नव्हे, दीपिका, जेलो, सेरेना, किम कार्दाशियन आणि लेडी गागाने केला कहर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या