नेटकऱ्यांनी निक जोनसला म्हटलं, National Jiju; देसी गर्लच्या नवऱ्याने दिली अशी प्रतिक्रिया

नेटकऱ्यांनी निक जोनसला म्हटलं, National Jiju; देसी गर्लच्या नवऱ्याने दिली अशी प्रतिक्रिया

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) 2 वर्षापूर्वी अमेरिकन गायक (American Singer) निक जोनस (Nick Jonas) बरोबर विवाह बंधनात अडकली. तेव्हापासूनच फक्त भारतातच (India) नाही तर सगळ्या जगात (World) प्रियांका आणि निक हे बहुचर्चित कपलपैकी एक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: गायक निक जोनस (Nick Jonas) आणि अभिनेत्री  प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचं जगभरात 'आऊटस्टँडिंग कपल' (Outstanding Couple) अशी ओळख आहे. एक आठवड्यापूर्वीच निक आणि प्रियंकाने लग्नाची 2 वर्ष पूर्ण केली. याच प्रसंगी प्रियांका आणि निक ने व्हिडीओ कॉन्फेरंसिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून त्यांच्या काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. दरम्यान निकने त्याच भारतावरचं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच भारतीय संस्कृती (Indian Traditions) त्याला खूप आवडत असून त्याला या बद्दल नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात असे निकने सांगितले आहे.

प्रियांका आणि निकच्या वेडींग रिसेप्शनला (Wedding Reception) खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील हजेरी लावली होती. तेव्हा सोशल मीडियावर 'नॅशनल जीजू' असा हॅशटॅग निकसाठी ट्रेंडिंग झाला होता.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान बोलताना निक म्हणाला 'मला वाटतं प्रियांका एकप्रकारे सगळ्या भारत (India) देशाची बहीण आहे आणि त्या बहिणीचा नवरा असल्याचा मला कायम आनंद आहे'. प्रियांका आणि निकच्या लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसानिमित्त निकने काही फोटो शेअर केले होते, जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

प्रियांका आणि निक सध्या लंडनमध्ये संसार करत आहेत. लग्नाच्या  या दुसऱ्या वाढदिवशी निक आणि प्रियंकाला त्याच्या चाहत्यांकडून लाखो शुभेच्छा आल्या आहेत. बॉलिवूड मध्ये पदार्पण करुन हॉलिवूडपर्यंत मजल मारलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या बॉलिवूड फिल्म 'द व्हाइट टायगर' आणि हॉलिवूड फिल्म 'मॅट्रिक्स 4' मधून लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 8:48 PM IST

ताज्या बातम्या