VIDEO: रितिकासोबत पहिल्या भेटीवेळीच रोहित शर्माला मिळाली होती दूर राहण्याची धमकी

VIDEO: रितिकासोबत पहिल्या भेटीवेळीच रोहित शर्माला मिळाली होती दूर राहण्याची धमकी

रोहितने तीन वर्षांपूर्वी गौरव कपूरच्या (Gaurav Kapoor) ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं.

  • Share this:

मुंबई, 15 जून:  भारतात बॉलिवूड (Bollywood) सेलेब्रिटी इतकेच क्रिकेटपटूही (Cricketers) लोकप्रिय आहेत. चाहत्यांना जितकी उत्सुकता सेलेब्रिटीबद्दल असते तितकीच क्रिकेटपटूबद्दलही असते. क्रिकेट आणि बॉलिवूड यांचंही घनिष्ट नातं आहे. स्टार्स आणि क्रिकेटर्स यांच्या प्रेमप्रकरणांचीही नेहमीच चर्चा होत असते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे याचं ताजं उदाहरण म्हणता येईल. आणखी काही जोड्याही स्टार कपल (Star Couple) म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका (Rohit Sharma and Ritika) या जोडीचाही समावेश आहे. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघातील एक स्टार खेळाडू असून, पाच वेळा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमचं नेतृत्व त्यानं सांभाळलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

या स्टार खेळाडूची लव्हस्टोरीही (Love story) फिल्मी आहे. तीन वर्षांपूर्वी गौरव कपूरच्या (Gaurav Kapoor) ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये त्यानं आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात जिथून झाली त्या पहिल्या भेटीची कहाणी तर खूपच रंजक आहे.

रोहित मैदानावर असतो तेव्हा रितिका अनेकदा उपस्थित असते. ती अतिशय अस्वस्थ असते; पण ती त्याला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच हजर असते. रोहित कायम रितिकानं त्याला दिलेल्या पाठिंब्याबाबत तिचं कौतुक करत असतो. त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात रितिका त्याच्या पाठीशी उभी होती आणि नेहमी असते, असं त्यानं अनेकवेळा अनेक ठिकाणी सांगितलं आहे. त्यांच्यात मैत्रीचं नातंही अधिक घट्ट असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

रोहित आणि रितिकाची पहिली भेट झाली तेव्हाची आठवण मात्र अतिशय मजेशीर आहे. एखाद्या चित्रपटातहिरोईनचा भाऊ हिरोला आपल्या बहिणीपासून लांब राहण्याची ताकीद देतो, तशीताकीद रोहितला मिळाली होती ती ही त्याच्याच संघातल्या एका दिग्गजक्रिकेटपटूकडून. हा क्रिकेटपटू होता युवराजसिंग (Yuvraj Singh).   युवराजसिंग रितिकाला बहीण (Sister) मानतो, ती त्याला राखी बांधते. रोहितची रितिकाशी पहिली भेट झाली ती एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान. युवराजसिंग, इरफान पठाण यांचं एका ठिकाणी जाहिरातीसाठी शूटिंग होणार होतं, तेव्हा रोहित संघातील वरिष्ठ खेळाडू असलेल्या युवराजसिंगला भेटण्यासाठी तिथं पोहोचला.त्यावेळी रितिकाही तिथं होती. रोहितचं तिच्याकडं लक्ष गेलं आणि वारंवार त्याची नजर तिच्याकडे वळू लागली. रोहित रितिकाकडं पाहात असल्याचं लक्षात येताच युवराज त्याला म्हणाला, ‘तिच्याकडे बघूदेखील नकोस, ती माझी बहीण आहे.’

(हे वाचा:  'तू तर अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस'; हटके लुकमुळे अभिनेत्री झाली ट्रोल )

यावररो हितनं, ‘काय भाई,  मी तुम्हाला भेटायला आलो आहे.’ असं सांगत सारवासारव केली. तरीही नंतर रोहित रितिकाकडंच पहात राहिला; पण ती खूपच शिष्ट आहे, असं त्याला वाटलं. शूटिंगनंतर रितिका रोहितकडं गेली आणि काही अडचण असेल तर मला सांग, असं तिनं त्याला सांगितलं. यानंतर मात्र दोघांची चांगली मैत्री झाली.

कालांतरानं मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्यानंतर 2015 मध्ये त्यांचं लग्न झालं. 2018 मध्ये त्यांना एक मुलगीही झाली. तिचं नाव समायरा आहे. या आनंदी जोडप्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत असतात.

Published by: Aiman Desai
First published: June 15, 2021, 2:28 PM IST

ताज्या बातम्या