मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

IND vs AUS : प्रेग्नंट अनुष्का शर्मावर फुटलं भारताच्या पराभवाचं खापर; ट्विटरवर होतेय ट्रोल

IND vs AUS : प्रेग्नंट अनुष्का शर्मावर फुटलं भारताच्या पराभवाचं खापर; ट्विटरवर होतेय ट्रोल

भारतीय संघाच्या या पराभवाला कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.

    मुंबई, 20डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) लाजिरवाणा पराभव झाला. पहिल्या इनिंगमध्ये 244 रन काढणारी टीम इंडिया, दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 36 रनवर ऑल आऊट झाली . टी 20 वा असो  वन- डे शतक गाठण्यासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली टेस्ट मॅचमध्ये केवळ  74 रनवर आऊट झाला आणि मॅच फिरली. विराटची विकेट गेल्यानंतर भारताच्या 7 विकेट फक्त 56 रनवर गेल्या. जर तेव्हा विराट आऊट झाला नसता तर चित्र काही वेगळं असत अशी भारतीय चाहत्यांचा  समज आहे. टीम इंडियाच्या पराभवासाठी अनुष्काला जबाबदार धरलं जात आहे. तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात येत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli)  जानेवारी 2021 मध्ये आई-वडील होणार आहेत. विराट India vs Australiaचा पहिला सामना संपवून बायको अनुष्काकडे परतणार आहे. बायकोच्या काळजीपोटी नवरा म्हणून लक्ष देत असताना विराट कर्णधार म्हणून आपल्या टीमकडे लक्ष द्यायला विसरला, अशी टीका सोशल मीडियावर  नेटकऱ्यांकडून होत आहे. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवाला अभिनेत्री अनुष्का शर्माचं जबाबदार असल्याचं बोलल्या जात आहे.  (India vs Australia) पराभवानंतर अनुष्का शर्मा ट्विटरवर नंबर 1 वर ट्रेंड होत आहे . टीम इंडियाच्या कामगिरीवर नाराज चाहत्यांनी अनुष्का शर्मावर खापर फोडल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील अनुष्का विराटची  मॅच बघायला आल्यावर तो लगेच बाद होतो यावरून अनुष्काला जोरदार ट्रोल करण्यात आलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Anushka sharma, Twitter, Virat kohali

    पुढील बातम्या