Home /News /entertainment /

बॉलिवूडला आणखी एक धक्का; 'मैने प्यार किया'चे संगीतकार 'राम-लक्ष्मण' यांचं निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का; 'मैने प्यार किया'चे संगीतकार 'राम-लक्ष्मण' यांचं निधन

'देवा हो देवा गणपती देवा', 'जीवन गाणे गातच रहावे' यांसारख्या सुपरहिट गाण्यांचे निर्माते 'राम-लक्ष्मण' काळाच्या पडद्याआड

    मुंबई 22 मे: मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण (Ram-Laxman) यांचं निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते एका दिर्घ आजारामुळं त्रस्त होते. 21 मे रोजी रात्री 1 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Indian composer Ram Laxman passes away) राम लक्ष्मण यांच्या निधनामुळं भारतीय संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाहूया राम लक्ष्मण यांचा अल्पपरिचय... राम-लक्ष्मण यांचं खरं नाव विजय पाटील (Vijay Patil) असं होतं. ते आपला खास मित्र राम कदम (Ram kadam) यांच्या मदतीनं संगीतनिर्मितीचं कार्य करत होते. 1976 पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी 'राम-लक्ष्मण' ह्या नावानं संगीत द्यायचे. मात्र 1977 मध्ये राम कदम यांचं निधन झालं. परंतु आपल्या मित्राच्या आठवणीत 'राम-लक्ष्मण' या नावानच संगीत देणं सुरू ठेवलं. राम-लक्ष्मण यांनी मराठीसह हिंदीतही आपल्या संगीताची वेगळी छाप सोडलेली होती. त्यांनी मराठीत 'पांडू हवालदार' या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. 'हम से बढकर कौन' चित्रपटातलं 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. राम-लक्ष्मण यांनी देवानंद, मनमोहन देसाई, महेश भट्ट, दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केलं होतं. '2 महिन्याच्या बाळाला हवंय आईचं दूध'; भूमी पेडणेकरचं भावनिक आवाहन 'मैने प्यार किया' या चित्रपटातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी 'पत्थर के फूल', 'सातवा आस्मान', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' आदी सिनेमांना संगीत दिलं होतं. त्यांनी आजवर 75 हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं आहे. 'अंजनीच्या सुता तुला', 'खेळ कुणाला दैवाचा कळला', 'जीवन गाणे गातच रहावे', 'झाल्या तिन्ही सांजा करून', 'पिकलं जाभूळ तोडू नका' या त्यांच्या गाण्यांनी मराठी मनावर अधिराज्य निर्माण केलं होतं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Song

    पुढील बातम्या