अरेरे! भूक-भूक करत अन्नाच्या शोधात विराट-अनुष्का आले रस्त्यावर, PHOTO VIRAL

अरेरे! भूक-भूक करत अन्नाच्या शोधात विराट-अनुष्का आले रस्त्यावर, PHOTO VIRAL

टीम इंडियाचं वेळापत्रक बीझी असल्यामुळे अनुष्का आणि विराटला एकमेकांसाठी वेळ देता येत नाही.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या काही काळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिनं सध्या कोणताही नवा सिनेमा साइन केलेला नाही. ती 2018मध्ये शेवटची शाहरुख खानसोबत ‘झीरो’ सिनेमामध्ये दिसली होती. त्यानंतर तिनं पती विराट कोहली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. वर्ल्डकपनंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टी20मध्ये यजमान वेस्ट इंडिज संघाला क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडियाचं लक्ष आता वनडे सीरिजवर आहे. तीन सामन्यांच्या या सीरिजमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता पुढचे दोन्ही सामने जिंकण्याकडे सध्या टीम इंडिया लक्ष केंद्रीत करत आहे.

 

View this post on Instagram

 

Mr and Mrs 💑❤

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

वर्डकपनंतर काही दिवसातच हा दौरा असल्यानं टीम इंडियाचं वेळापत्रक काहीसं व्यग्रच आहे. त्यामुळे अनुष्का आणि विराटला एकमेकांसाठी वेळ देता येत नाही पण एवढ्यावर शांत राहील ती अनुष्का कसली. अनुष्का सुद्धा सध्या विराटसोबत वेस्ट इंडिजला पोहोचली असून गुरुवारचा समाना रद्द झाल्यानंतर अनुष्का आणि विराट देसी लंचसाठी गयानाच्या रस्त्यावर फिरताना दिसले. पण विशेष म्हणजे त्यांना या ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट सापडलं आणि त्यांनी देसी जेवणावर ताव मारला. याचे फोटो विराट आणि अनुष्कानं त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले.

बॉलिवूडच्या 'या' चॉकलेट हिरोनं बालपणाच्या मैत्रिणीशी गुपचूप केला साखरपुडा?

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिनं सध्या तरी कोणताही बॉलिवूड सिनेमा साइन केलेला नाही. मात्र नेटफ्लिक्सच्या एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र त्यानंतर एका मुलाखतीमध्ये या सर्व अनुष्कानं फेटाळल्या. एका मुलीनं लग्न केल्यानंतर लगेचच काही दिवसात तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरू होतात. पण तिचे काही स्वतःचे प्लान असतील की नाही याचा विचार केला जात नाही. जग एवढं पुढे गेलेलं असताना आपण मात्र ते विचार घेऊन जगत आहोत. अशा शब्दात तिनं आपली नाराजी व्यक्त केली होती.

प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट

...तर माझंही 'तिहेरी तलाक'ला समर्थन असतं, विद्या बालनची प्रतिक्रिया

===============================================================

TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 02:15 PM IST

ताज्या बातम्या