पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो

आज वर्ल्डकप 2019 चा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना असल्यानं सगळीकडे देशभक्तीला उधाण आल्याचं चित्र आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 03:37 PM IST

पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवून आलेत बॉलिवूडचे 'हे' हिरो

आज वर्ल्डकप 2019 चा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना असल्यानं सगळीकडे देशभक्तीला उधाण आल्याचं चित्र आहे. दोन्ही देशांकडून आपापल्या संघांना जोरदार पाठिंबा दिला जात आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज पुन्हा एकदा क्रिकेट युद्ध पाहायला मिळत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात बॉलिवूडच्या त्या हिरोंविषयी ज्यांनी त्यांच्या सुपरहिट सिनेमांमधून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत बॉर्डरवर तिरंगा फडकवला...

जेपी दत्ता दिग्दर्शित 2003साली आलेल्या ‘LOC कारगील’ या सिनेमात अभिनेता संजय दत्तनं लेफ्टनंट कर्नल व्हाय. के. जोशी यांची भूमिका साकारली होती. भारतीय सेनेवर आधारित या सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरला होता. हा एक मल्टी स्टारर सिनेमा होता मात्र या सिनेमात संजय दत्तची भूमिका  प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली.

अभिनेता हर्षवर्धन राणेची प्रमुख भूमिका असेलेला ‘पलटन’ सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा जेपी दत्ता यांनी केलं होतं. मागील वर्षी रिलीज झालेल्या या सिनेमात हर्षवर्धन राणेनं मेजर हर्षवर्धन सिंह यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेत तो दुश्मनांना सडेतोड उत्तर देताना दिसला.

Loading...

सुपरहिट सिनेमा तिरंगामधील ब्रिग्रेडियर सूर्यदेव सिंह प्रेक्षकांना आजही लक्षात आहे. ही भूमिका अभिनेता राजकुमार यांनी साकारली होती. या सिनेमातील त्यांच्या दमदार संवादांची छाप अद्याप प्रेक्षकांवर दिसून येते.

1997मध्ये आलेल्या बॉर्डर सिनेमा बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर बनलेल्या सर्व सिनेमांमध्ये सर्वाधिक चर्चितसिनेमा ठरला. या सिनेमामध्ये भारतीय सैनिकांच्या सैन्यातील आणि वैयक्तिक जीवनानं हृदयद्रावक चित्रण करण्यात आलं होतं. पण अभिनेता सनी देओलनं साकारलेली मेजर कुलदीप सिंहची भूमिका विशेष गाजली.

मेजर साब या सिनेमात अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या मेजर जसबीर सिंहच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप वाहवा मिळाली. ‘मेजर साब’ हा एक सिनेमा अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्या सुपरहिट सिनेमांपैकी एक ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...