IND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री

आज भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असल्यानं रणवीरलाही तो लाइव्ह पाहण्याचा मोह आवरला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 04:37 PM IST

IND vs PAK : सामना पाहण्यात रंगला रणवीर सिंग, BCCI साठी केली भन्नाट कॉमेंट्री

मॅंचेस्टर, 16 जून :  ICC Cricket World Cup 2019 मधील भारत पाक महामुकाबल्याला सुरुवात झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्याने त्याच्या जागी केएल राहुल सलामीला येईल. केएल राहुल आणि हिटमॅन रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली आहे. पण तत्पूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सुद्धा हा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला पोहोचला आहे. एवढंच नाही तर सामना सुरू होण्यापूर्वी  रणवीर BCCI साठी भन्नाट कॉमेंट्री करताना दिसला.

IND vs PAK : सरफराजचे मामू म्हणाले...जितेगा तो भारतही !


Loading...


रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी सिनेमा '83'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र आज भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असल्यानं रणवीरलाही तो लाइव्ह पाहण्याचा मोह आवरला नाही आणि तो थेट मँचेस्टरला पोहोचला. हा सामाना सुरू होण्याआधी रणवीरनं BCCI साठी कॉमेंट्री सुद्धा केली हा व्हिडिओ BCCI नं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून शेअर केला आहे. यामध्ये रणवीर भारतीय संघाला चिअरअप करताना दिसत आहे.

केएल राहुलचे संयमी अर्धशतक, भारताच्या सलामीवीरांची कमाल'83'च्या शूटिंगसाठी रणवीर सध्या लंडनमध्ये आहे. हा सिनेमा 19983मध्ये पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाच्या विजयावर आधारित आहे आणि रणवीर सिंग या सिनेमामध्ये माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण यात कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत असून यात रणवीर व्यतिरिक्त हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला प्रदर्शित होणार आहे.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 04:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...