IND vs PAK : मॅच दरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ आहे तरी कोण?

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान सैफ सोबत करिना नाही तर दुसरीच कोणीतरी मुलगी पाहताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 09:38 PM IST

IND vs PAK : मॅच दरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ आहे तरी कोण?

मँचेस्टर, 16 जून :  ICC Cricket World Cup 2019 मधील भारताचा चौथा सामना आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर सुरू आहे. या निमित्तानं टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी सैफ अली खान आणि रणवीर सिंह मँचेस्टरला पोहोचले आहेत. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत करिना नाही तर कोणीतरी वेगळीच मुलगी दिसत आहे आणि हे दोघंही टीम इंडियाला चिअर अप करताना दिसत आहे. त्यामुळे सैफसोबत असलेली ती नक्की आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

INDvsPAK : नशीब असावं तर विजय शंकरसारखं नाहीतर काहीच नसावं!
Loading...

 

View this post on Instagram
 

India V Pakistan father’s day celebrations with my on screen father from #JawaaniJaaneman, #SaifAliKhan✨


A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान सैफ सोबत करिना नाही तर दुसरीच कोणीतरी मुलगी पाहताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सैफच्या आगामी सिनेमामधून डेब्यू करणारी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला आहे. आलिया सैफच्या आगामी ‘जवानी जानेमान’ या सिनेमामध्ये त्याच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी सुरूवातीला सारा अली खानला विचारण्यात आलं होतं मात्र तिनं आपल्या वडीलांसोबत काम करण्यास नकार दिल्यानं ही भूमिका आता आलिया फर्निचरवालाला मिळाली आहे.

‘लस्ट स्टोरी’च्या व्हायब्रेटर सीनसाठी कियारा अडवाणीनं अशी केली होती तयारी
 

View this post on Instagram
 

⚡️⚡️⚡️ Photo by @rishamkbawaphotography Make up by @anumariyajose Hair by @iosiswellness


A post shared by ALAIA F (@alaiaf_) on

आलिया सोशल मीडिया नेहमीच सक्रीय असलेली दिसते. आपल्या रोजच्या रुटीन पासून ते कामासंबंधी अनेक व्हिडिओ आणि फोटो ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. जवानी जानेमन सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याअगोदर आलिया सैफ आणि सिनेमातील इतर कलाकारांसोबत वेळ घालवत आहे. या विषयी एका मुलाखती दरम्यान आलिया म्हणाली, मी डेब्यू सिनेमामध्येच प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करत आहे. त्यामुळे मनात थोडीशी भीती आहे. त्यामुळे या सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याआधी काही काळ मी सिनेमातील कलाकारांसोबत वेळ घालवावा असं दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी सुचवलं.

‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’
 

View this post on Instagram
 

Photo by the lovely @sashajairam Hair and make up by @saherahmed91 @fazemanagement Styled by @alliaalrufai


A post shared by ALAIA F (@alaiaf_) on
 

View this post on Instagram
 

Only this city can make me smile this big. . . . . . Photo by @marshallsharp 💜


A post shared by ALAIA F (@alaiaf_) on
 

View this post on Instagram
 

No competition, I don't really listen . . . . . Photo by📷: @elena.dupisanie


A post shared by ALAIA F (@alaiaf_) on
 

View this post on Instagram
 

📷: @bascketcase


A post shared by ALAIA F (@alaiaf_) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...