India vs New Zealand World Cup Semi Final : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओही होतोय व्हायरल

सिनेमात बिग बी हा डायलॉग प्राण यांना बोलताना दाखवण्यात आले आहे. पण यावेळी हा डायलॉग भारतीय क्रिकेट प्रेमी बोलत असतील असेच वाटते.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 09:26 PM IST

India vs New Zealand World Cup Semi Final : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओही होतोय व्हायरल

मुंबई, 10 जुलै- बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना अनेकांनी एका मीममध्ये टॅग केलं आहे. विशेष म्हणजे अमिताभ यांनीही ते ट्वीट रिट्वीट करत या मीमचा आनंद घेतला. न्यूझीलंड आणि भारतात काल उपांत्य फेरीचा सामना झाला. मात्र पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला. आज पुन्हा या सामन्याची सुरुवात होऊन न्यूझीलंडने भारताला 240 धावांचं आव्हान दिलं. दरम्यान बिग बी यांनी हे मीम त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.

व्हायरल होत असलेल्या मीममध्ये अमिताभ यांच्या 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या कालिया सिनेमातील एक डायलॉग दाखवण्यात आला आहे. सिनेमात बिग बी हा डायलॉग प्राण यांना बोलताना दाखवण्यात आले आहे. पण यावेळी हा डायलॉग भारतीय क्रिकेट प्रेमी बोलत असतील असेच वाटते. ‘यू समझ लिजिए की हमारे और आपके बीच जो बाजी शुरू हुई थी, वो थोडी देर के लिए रुक गयी. खेल जब शुरू होगा, तो मोहरे हम उसी जगह से उठाएंगे जहां इस वक्त ठेहरे है.’

Loading...

हे मीम शेअर करताना बिग बी यांनी ‘हाहाहाहा’ असे लिहिले. बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल कोहलीनेही न्यूझीलंड आणि भारत सामन्या दरम्यानची परिस्थिती दाखवण्यासाठी या मीमचाच वापर केला आहे.

Batla House Trailer: ‘हमारे 17 करोड मुसलमानों को पढना नही आता?’

World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव

'या' गंभीर आजाराशी लढतेय ‘तपस्या’, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर

ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...