मुंबई 25 मार्च : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोक मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहेत. तर सगळेच बॉलिवूड स्टार्सही सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आणि अनेक गोष्टींवर व्यक्तही होत असतात. अनेकदा त्यांच्या परखड मतांवरून वादही झाले आहेत. लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर एका चाहत्याने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर ऋषी कपूर चांगलेच भडकले आणि त्याला गप्प केलं.
देशात 21 दिवसांचा लॉकडाउन आहे. त्यामुळे तुम्ही तेवढे दिवस पुरेस एवढा दारुचासाठा केला का? असा प्रश्न एका चाहत्याने त्यांना विचारला होता. तो प्रश्न त्यांना चांगलाच खटकला आणि ते भडकले. माझा देश आणि माझी लाईफ स्टाईल यावर कुणी ट्रोल केलेलं मला आवडत नाही. असे मेसेजेस मी डिलीट करून टाकेन अशी तंबीच त्यांनी दिली. विषय अतिशय गंभीर आहे. त्याची जाणीव ठेवा हा गंमतीचा विषय नाही अशी समजही त्यांनी दिली.
भारतातील (India) कोरोनाग्रस्त (Corona virus) रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक 122 रुग्ण आहेत. म्हणजे प्रत्येकी पाचवा रुग्ण हा राज्यातील आहे.
ANYONE CRACKING JOKES ABOUT MY COUNTRY OR ON MY LIFESTYLE, WILL BE DELETED. BE AWARE AND WARNED. THIS IS A SERIOUS MATTER. HELP US TO TIDE OVER THE SITUATION.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाव्हायरसची एकूण आकडेवारी जारी केली आहे. एकूण 606 प्रकरणांपैकी 553 प्रकरणं अॅक्टिव्ह आहेत, तर 42 रुग्ण बरे झालेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळलेत. यामध्ये मुंबईत 9, ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर सांगलीत एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. तर राज्यातील पहिले 2 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.