माही गीललाही आला कास्टींग काऊचचा अनुभव, म्हणाली...!

माहिलाही तिला कास्टींग काऊचबाबत आलेल्या अनुभवांबद्दल विचारलं असता सुरूवातीच्या काळात आपल्यासोबत हे सारं अनेकदा घडल्याचं तीने मान्य केलंय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 3, 2018 10:08 AM IST

माही गीललाही आला कास्टींग काऊचचा अनुभव, म्हणाली...!

03 मे : कास्टींग काऊचबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू असताना दररोज एक एक अभिनेत्री मी टू म्हणत याबाबत आपल्याला आलेले अनुभव मांडतेय. यात पुढचं नाव आहे ते माही गीलचं. माहिलाही तिला कास्टींग काऊचबाबत आलेल्या अनुभवांबद्दल विचारलं असता सुरूवातीच्या काळात आपल्यासोबत हे सारं अनेकदा घडल्याचं तीने मान्य केलंय.

कधी कास्टींग डिरेक्टर्स तर कधी दिग्दर्शकांनी आपल्याकडे अशी मागणी केली. मात्र मी अशावेळी तिथून निसटण्याचा प्रयत्न केला हे ही तीने आवर्जून नमूद केलंय.

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यात कास्टींग काऊच सारख्या मोहिमेमुळे महिलांना आपले अनुभव सांगण्याची संधी मिळाली. त्यामुळे बॉलिवूड पासून ने संसदेपर्यंत महिलांवर अत्याचार होतात असाच खळबळजनक मुद्दा या सगळ्यातून समोर आला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 10:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...