मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Happy Independence Day: ही ‘देशभक्तीपर’ गाणी ऐकून तुम्ही व्हाल रोमांचित

Happy Independence Day: ही ‘देशभक्तीपर’ गाणी ऐकून तुम्ही व्हाल रोमांचित

यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी बॉलिवूडमधील काही देशभक्तीपर गाणी लावून एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 15 ऑगस्ट: आज 15 ऑगस्ट, संपूर्ण देशात आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. (Happy Independence Day) यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी बॉलिवूडमधील काही देशभक्तीपर गाणी लावून एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. (Independence Day song) यातील बरीच गाणी अशी आहेत की ती तुम्ही लहानपणापासून ऐकत असाल आणि आजही या गाण्यांचा भाव तसाच आहे. चला तर मग ही हिट लोकप्रिय देशभक्तीपर गाणी पाहुयात. ऐ वतन मेरें (कर्मा) - कर्मा चित्रपटातील हे गाणं मोहम्मद अझीझ आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलं आहे. हे गाणं ऐकून मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. मानसीने खास अंदाजात दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; मोनोक्रोम फोटो झाले VIRAL मेरा रंग दे बसंती चोला – द लेजंड ऑफ भगत सिंग चित्रपटातील ‘रंग दे बसंती चोला’ या गाण्यात, भगतसिंग आणि त्याचे साथीदार देशासाठी प्राणांची आहुती देत ​​असताना फाशी देण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू कसा आनंदानं साजरा करतात हे दाखवण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल; युजर्स म्हणाले... कर चलें हम फिदा - ‘कर चले हम फिदा’ या गाण्यात, शत्रूंपासून देश वाचवण्यासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात हे दाखवण्यात आलं आहे. तेरी मिट्टी (केसरी) - अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील हे गाणं बी प्राकनं गायलं आहे. या गाण्यात देशासाठी लढणाऱ्या सैनिकांबद्दल, ते आपलं प्रेम आणि कुटुंब सोडून देशासाठी कसे लढतात याबद्दल सांगण्यात आलं आहे. ऐ वतन (राझी) - आलिया भट्ट स्टारर फिल्म राझी मधील हे ‘ए वतन’ गाणं प्रचंड भावनिक आहे. हे ऐकून आपणही देशासाठी काहीतरी करावं असं वाटतं. हे गाणं सुनिधी चौहाननं गायलं आहे.
First published:

Tags: Bollywood, Independence day

पुढील बातम्या