वॉन्टेड'फेम इंदर कुमार काळाच्या पडद्याआड

वॉन्टेड'फेम इंदर कुमार काळाच्या पडद्याआड

अंधेरीतल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला

  • Share this:

28 जुलै: 'वॉन्टेड' आणि 'तुमको ना भूला पायेंगे' या सिनेमांमधील सलमानचा सहकलाकार इंदर कुमार यांचं निधन ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचं वय 43वर्षे होतं. अंधेरीतल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'मासूम' या सिनेमातून इंदर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांची वॉन्टेडमधली भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांनी 20 चित्रपटांमध्ये काम केले. 'क्यू की सास भी कभी बहू थी' या मालिकेतही त्यांनी मिहीर विरानीची भूमिका साकारली होती. सध्या ते 'फटी पडी है ना यार' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. पण मध्यरात्री अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 01:03 PM IST

ताज्या बातम्या