मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

डेटिंग, व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक चर्चेनंतर Urvashi Rautela रिषभ पंतसाठी थेट दुबईत दाखल; फोटो झाले व्हायरल

डेटिंग, व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक चर्चेनंतर Urvashi Rautela रिषभ पंतसाठी थेट दुबईत दाखल; फोटो झाले व्हायरल

डेटिंग, व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक चर्चेनंतर Urvashi Rautela रिषभ पंतसाठी थेट दुबईत दाखल

डेटिंग, व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक चर्चेनंतर Urvashi Rautela रिषभ पंतसाठी थेट दुबईत दाखल

टीम विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK)सामन्याचा थरार लाईव्ह पाहण्यासाठी ऊर्वीशी रौतेला (Urvashi Rautela) दुबईत दाखल. जेव्हा ती टीव्ही स्क्रिनवर दिसली तेव्हा ती स्पेशल फॅन स्टॅण्डवर तिरंगा फडकवताना दिसली.

  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानकडून टीम इंडियाला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. पण टीम इंडियाचा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) साथ देत चमकदार कामगिरी केली. त्याच्या खेळीचे कौतुक होत असानाच, दुबईच्या स्टेडियममधील त्याच्या कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री ऊर्वीशी रौतेलाने (Urvashi Rautela) सर्वांचे लक्ष वेधले आहे. डेटिंग, व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉक चर्चेनंतर ऊर्वीशी रौतेला थेट दुबईत दाखल झाली आहे. जेव्हा ती टीव्ही स्क्रिनवर दिसली तेव्हा ती स्पेशल फॅन स्टॅण्डवर तिरंगा (Is Rishabh Pant getting close to Urvashi Rautela again?)फडकवताना दिसली.

जवळपास दोन वर्षांनी टीम विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळवण्यात आल्याने दोन्ही संघाचे चाहते एन्जॉय करताना दिसले. यामध्ये अभिनेत्री ऊर्वीशी रौतेलाने देखील आपली हजेरी लावली होती. विशेष म्हणजे रिषभ पंत चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत असताना सोशल मीडियावर उर्वीशीचे फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ऊर्वीशी स्टेडियममध्ये भारताचा तिरंगा फडकविताना दिसत होती. त्यामुळे रिषभ पंत आणि उर्वीशी यांच्या अफेअरच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

ऊर्वीशी आणि रिषभ यांच्यातील प्रेमसंबंधांची सर्वात आधी 2018 साली चर्चा होती. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा तेव्हा पसरल्या होत्या. सोशल मीडियावर या संदर्भात प्रचंड चर्चा झाल्यानंतर काही दिवसांनी ऋषभ पंतने ऊर्वीशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याची माहिती समोर आली होती.

त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण काही दिवसांपूर्वी ऊर्वीशीने रिषभला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आज स्टेडियममध्ये देखील ऊर्वीशी बघायला मिळाली.

दरम्यान, हा सामना बघण्यासाठी उर्वीशीसह अभिनेता अक्षय कुमार, बीसीसीआय अध्यक्ष जय शाह देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

First published:

Tags: India vs Pakistan, Rishabh pant, T20 cricket, T20 league, T20 world cup, Urvashi rautela