ईशाचं बदललेलं हे रूप पाहून प्रेक्षकांना बसणार धक्का

ईशाचं बदललेलं हे रूप पाहून प्रेक्षकांना बसणार धक्का

सर्व परिस्थिती लक्षात आल्यावर ईशा पूर्ण बदलून जाणार. ती सर्व सूत्र आपल्या हाती घेणार आणि प्रेक्षकांना अनेक धक्के देणार.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : 'तुला पाहते रे' मालिकेत बरीच वळणं येतायत. ईशाच्या डोक्यातून गजा पाटील काही जात नव्हता. त्यात एक दिवस जालिंधरकडूनच तिला विक्रमच्या दुसऱ्या रूपाबद्दल कळतं. विक्रांतनं आपल्याला फसवलंय, हे लक्षात येताच ती सैरभैर होते.

ईशा ट्रकसमोर येणार, इतक्यात जोगतीण तिला वाचवते. देवीसमोर बसवून तिला पाण्यात पाहायला सांगते. त्यात ईशाला राजनंदिनीचा चेहरा दिसतो. पण ती कोण हे काही तिला कळत नाही. त्याचाही उलगडा आता येत्या आठवड्यात होणार आहे.

इकडे आधी आपल्या स्वार्थासाठी विक्रांतनं ईशाशी लग्न केलं. पण आता विक्रांतला ईशाबद्दल प्रेम वाटू लागतं. एक दिवस तो स्वत:हून ईशाला त्या बंद खोलीत घेऊन जातो. तिथे राजनंदिनीचा फोटो लावलाय. तो बघून ईशाला धक्का बसतो. कारण पाण्यात जिचं प्रतिबिंब पाहिलेलं असतं ती राजनंदिनी असते.

सर्व परिस्थिती लक्षात आल्यावर ईशा पूर्ण बदलून जाणार. ती सर्व सूत्र आपल्या हाती घेणार आणि प्रेक्षकांना अनेक धक्के देणार.

विक्रम जे काही भासवण्याचा प्रयत्न करत असतो तेच खरं असतं. ईशा हा राजनंदिनीचा दुसरा जन्म असतो. आता येत्या आठवड्यात मालिकेत बऱ्याच वेगवान घटना घडणार आहेत. राजनंदिनी म्हणजेच शिल्पा तुळसकर मालिकेत दिसणार आहे. राजनंदिनी ही आईसाहेबांची मुलगी आणि विक्रांत त्यांचा जावई आहे. हेही आता पुढच्या काही भागात उघड होणार आहे.

सुबोध भावेनं या मालिकेत चांगल्या आणि वाईट व्यक्तीच्या छटा तेवढ्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत.

या मालिकेविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला होता, 'टीव्ही माझं आवडतं माध्यम आहे. ही मालिका खूपच लोकप्रिय झालीय. अगदी मराठी भाषिक नसलेलेही मला मालिका आवडते म्हणून मेसेज करतात. या मालिकेची सुरुवात आणि शेवट मला माहीत आहे. मी मालिका एंजाॅय करतोय.'

निर्माता आणि कलाकार, सुबोधला कुठली भूमिका जास्त आवडते? यावर तो सांगतो, ' माध्यमाशी जोडणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग कुठलीही भूमिका असो.'

SPECIAL REPORT : राज ठाकरे Vs मुख्यमंत्री फडणवीस, वाकयुद्ध आज पुन्हा भडकणार?

First published: April 6, 2019, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading