विक्रांत सरंजामेचं गुपित ईशा घरी कधी सांगणार?

विक्रांत सारखा ईशाला सांगतोय, तू घरी सांग. पण ईशाचा धीरच होत नाहीय.

News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2018 02:23 PM IST

विक्रांत सरंजामेचं गुपित ईशा घरी कधी सांगणार?

मुंबई, 14 डिसेंबर : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'तुला पाहते रे' मालिका तिसऱ्या नंबरवर गेलीय. पण या आठवड्यात मालिकेत बरेच हाय पाॅइंट आले. त्यामुळे पुढच्या आठवड्यात मालिकेचा टीआरपी पुन्हा वर येण्याची शक्यता आहे.

विक्रांत सरंजामेनं ईशाला प्रपोझ केलं ते अगदी रोमँटिक पद्धतीनं. हेलिकाॅप्टरमधून त्यानं ईशाला फेरफटका मारवला. वरून जमिनीवर 'ईशा आय लव्ह यू' असं फुलांनी लिहिलेलंही ईशानं पाहिलं. तिच्या आयुष्यातला हा मोठा क्षण.

त्याच वेळी टिल्लूनी दिलेल्या माहितीनुसार ईशाचे वडीलही कर्जतच्या बंगल्यावर पोचले. ईशा आणि विक्रांतला एकत्र पाहून त्यांना धक्का बसला. तेव्हापासून ते अस्वस्थच आहेत. ईशाशी नीट बोलत नाहीत. गुरुचरित्राचं पारायण करायला बसलेत. अधेमधे टिल्लू येऊन त्यांचे कान भरतोच आहे.

इकडे विक्रांत सारखा ईशाला सांगतोय, तू घरी सांग. पण ईशाचा धीरच होत नाहीय.  पण येत्या दोन आठवड्यात ही परिस्थिती बदलणार आहे. ईशाच्या मदतीला विक्रांतच येणार आहे. ईशाला आपल्या आई-वडिलांना सांगणं जमत नाहीय पाहून तोच घरी येऊन लग्नाबद्दल बोलणार आहे.

जानेवारीत मालिकेत विक्रांत आणि ईशाच्या लग्नाचा बार उडणार आहे. ईशा-विक्रांतचं प्रेम, लग्न या घडामोडी मालिकेत सुरू होतीलच. पण आता विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. त्याबद्दल ईशाला अजून काहीच कल्पना नाहीय. प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी मालिकेत बऱ्याच गोष्टी घडतील.

Loading...

झी अॅवाॅर्डमध्ये 'तुला पाहते रे' मालिकेनं 9 पुरस्कार पटकावले.  सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार विक्रांत सरंजामेनं पटकावला. ईशा म्हणजे गायत्री दातारनं सर्वोत्कृष्ट चेहरा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केलंय.सर्वोत्कृष्ट जोडी ठरलीय विक्रांत आणि ईशाची. तर 'तुला पाहते रे' मालिकाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.


'या' अभिनेत्रीच्या 'किस'पासून सलमान राहिला वंचित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...