...आणि ईशाला समजतं तीच आहे राजनंदिनी

...आणि ईशाला समजतं तीच आहे राजनंदिनी

ईशाला राजनंदिनीची स्वप्न पडायला लागतात. ती उद्वेगानं आईवडिलांकडे येते.

  • Share this:

मुंबई, 18 मे : तुला पाहते रे मालिका आता रंजक वळणावर आलीय. विक्रांत ईशाला राजनंदिनीच्या खोलीत घेऊन जातो. तेव्हापासून ईशाला राजनंदिनीची स्वप्न पडायला लागतात. ती उद्वेगानं आईवडिलांकडे येते.

शेवटी तो क्षण येतो. ईशाला कळून चुकतं आपणच राजनंदिनी आहोत. गेल्या जन्मी ईशा राजनंदिनी असते. हे तिला कळतं आणि ते ती आई-वडिलांना सांगते. त्यांना धक्का बसतो. अशा वेळी ती जोगतीणही ईशाला मदत करते.

बिग बींनी शेअर केला 'पुकार'च्या सेट वरील फोटो, ओळखा पाहू कोण आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री ?

आतापर्यंत ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे, हे विक्रांतला दाखवायचं असतं. पण खरोखर ईशाला सगळं आठवल्याचं मालिकेत दाखवलंय. त्यामुळे आता ते विक्रांतच्याच जिवावर उठणार आहे. रविवारच्या महाएपिसोडमध्ये अशा बऱ्याच गोष्टी पाहता येतील.

'असं' असेल बिग बाॅस मराठीचं नवं घर, दुसऱ्या सीझनची उत्सुकता शीगेला

गजा पाटील हा सरंजामे कंपनीत मोठा भ्रष्ट माणूस आहे आणि तो कित्येक वर्ष सरंजामे कंपनीला फसवत आहे हे ईशाला समजताच ती गजा पाटीलच्या मागावर लागते. या प्रकरणाने विक्रांत मात्र पुरता हादरतो. त्याला आता असं वाटू लागतं की जर ईशाने या प्रकरणाचा छडा लावला तर तिला हे समजणार की गजा पाटील म्हणजेच विक्रांत सरंजामे. त्यामुळे घाबरलेला विक्रांत भलत्याच माणसाला गजा पाटील म्हणून सगळ्यांसमोर पेश करतो.

Cannes 2019 – रेड कार्पेट सोडून प्रियांकाचा ड्रेस निट करण्यात निक जोनस बिझी

मात्र विक्रांतच्या दुर्भाग्याने काही दिवसातच विक्रांत हाच गजा पाटील आहे हे ईशाला समजतं आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते. त्यातच विक्रांत हा सरंजामे फॅमिलीचा मुलगा नसून जावई आहे हे सुद्धा तिला कळतं आणि इतका मोठा विश्वासघात केल्यामुळे ईशा पुरती मनाने तुटते. खचून जाते. अशीच एकदा भेदलेल्या अवस्थेत ईशा रस्त्यातून जात असताना ट्रक उडवणार तोच जोगतीण तिचा हात खेचते आणि तिला वाचवते. तसंच ईशाचा जन्म हा एका उद्देशाने झाल्याचे ती आठवण करून देते. समोर ठेवलेल्या परातीतल्या पाण्यात ती ईशाला बघायला सांगते. ईशा परातीत बघते आणि तिला राजनंदिनीचा चेहरा दिसतो.


VIDEO : झिंगाट वऱ्हाडी मंडळाने पोलिसालाच केली बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या