S M L

विक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...

सध्या तुला पाहते रे मालिकेत विक्रांत आणि ईशामध्ये प्रचंड तणाव सुरू आहे. ईशाला आपलं खरं रूप कळतंय हे पाहून विक्रांत हादरून जातो.

Updated On: Apr 18, 2019 08:10 PM IST

विक्रांत ईशासाठी गूढ दरवाजा उघडतो आणि...

मुंबई, 18 एप्रिल : सध्या तुला पाहते रे मालिकेत विक्रांत आणि ईशामध्ये प्रचंड तणाव सुरू आहे. ईशाला आपलं खरं रूप कळतंय हे पाहून विक्रांत हादरून जातो. तेव्हा झेंडे विक्रांतला ईशाला मारण्याचा सल्ला देतात,त्यावर विक्रांत भडकतो.

आता झालंय असं की विक्रांतला ईशाचं बदललेलं रूप आवडायला लागतं. तो खरंच तिच्या प्रेमात पडायला लागतोय. त्याला ईशाला गमवायचं नाहीय. म्हणून तो ईशाला त्या बंद खोलीत न्यायचं ठरवतो. जी बंद खोली सगळ्यांसाठी कायमची बंद असते, तिथे तो ईशाला घेऊन जायला निघतो.

बंद खोलीचं दार उघडतं आणि ईशाला आत राजनंदिनीचा फोटो दिसतो. पहिल्यांदाच ईशा राजनंदिनीला पाहते आणि तिला कळतं पाण्यात पाहिलेला तो चेहराही तोच आहे.


गजा पाटील हा सरंजामे कंपनीत मोठा भ्रष्ट माणूस आहे आणि तो कित्येक वर्ष सरंजामे कंपनीला फसवत आहे हे ईशाला समजताच ती गजा पाटीलच्या मागावर लागते. या प्रकरणाने विक्रांत मात्र पुरता हादरतो. त्याला आता असं वाटू लागतं की जर ईशाने या प्रकरणाचा छडा लावला तर तिला हे समजणार की गजा पाटील म्हणजेच विक्रांत सरंजामे. त्यामुळे घाबरलेला विक्रांत भलत्याच माणसाला गजा पाटील म्हणून सगळ्यांसमोर पेश करतो.

मात्र विक्रांतच्या दुर्भाग्याने काही दिवसातच विक्रांत हाच गजा पाटील आहे हे ईशाला समजतं आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते. त्यातच विक्रांत हा सरंजामे फॅमिलीचा मुलगा नसून जावई आहे हे सुद्धा तिला कळतं आणि इतका मोठा विश्वासघात केल्यामुळे ईशा पुरती मनाने तुटते. खचून जाते. अशीच एकदा भेदलेल्या अवस्थेत ईशा रस्त्यातून जात असताना ट्रक उडवणार तोच जोगतीण तिचा हात खेचते आणि तिला वाचवते. तसंच ईशाचा जन्म हा एका उद्देशाने झाल्याचे ती आठवण करून देते. समोर ठेवलेल्या परातीतल्या पाण्यात ती ईशाला बघायला सांगते. ईशा परातीत बघते आणि तिला राजनंदिनीचा चेहरा दिसतो.


Loading...

VIDEO: आधी लगीन लोकशाहीचं नंतर... !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 08:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close