Home /News /entertainment /

सुशांत सिंह प्रकरणात महेश भट्ट यांच्यासाठी मित्र अनुपम खेर आले धावून 

सुशांत सिंह प्रकरणात महेश भट्ट यांच्यासाठी मित्र अनुपम खेर आले धावून 

अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांच्यासाठी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

    मुंबई, 17 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नेपोटिजमचा मुद्दा अनेकदा समोर आला आहे. या मुद्द्यावरुन बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर निशाणा साधण्यात आला आहे. या यादीत करन जोहर, महेश भट्ट आणि जावेद अख्तर, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यातचं महेश भट्ट यांच्यावर  याकारणानेही निशाणा साधला जात आहे कारण त्यांचे रिया चक्रवर्ती हिच्याशी चांगले संबंध आहेत. सुशांत प्रकरणात महेश भट्ट ट्रोल, अनुपम खेर यांनी केलं रिएक्ट यादरम्यान महेश भट्ट यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की ते तोपर्यंत काहीच बोलणार नाही जोपर्यंत काही सिद्ध होत नाही. ते पुढे म्हणाले की मी महेशचा आभारी आहे.. त्याने माझ्यासाठी खूप केलं आहे. जोपर्यंत तो स्वत: येऊ मला काही सांगत नाही वा काही सिद्ध होत नाही मी त्यांना बेनिफिट ऑफ डाउट देऊ इच्छितो. मी आंधळा नाही मात्र आता काहीच बोलणार नाही..माझ्या कुटुंबांनी मला शिकवलं आहे की कधीच ते हात कापू नका जे तुम्हाला मदत करतात. हे वाचा-'13 जूनच्या रात्री 5 ते 6 जण आले होते सुशांतच्या घरी'; मित्राच्या दाव्याने खळबळ सुशांत सिंह राजपूत प्रकरणात चिडलेल्या चाहत्यांनी महेश भट्ट यांचा सडक 2 या चित्रपटाच्या ट्रेलरला नापसंती व्यक्त केली आहे. काहींच्या मते आतापर्यंत केव्हाच कोणत्याही चित्रपटाच्या ट्रेलरला इतके डिस्लाइक्स मिळाले नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाला, त्याचा परिणाम महेश भट्ट आणि या चित्रपटातील स्टारकास्ट आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांनाही झाला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या