मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांत मृत्यू प्रकरणात दिशाचे नाव गोवल्याने भडकले वडील; पोलिसात केली तक्रार

सुशांत मृत्यू प्रकरणात दिशाचे नाव गोवल्याने भडकले वडील; पोलिसात केली तक्रार

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात दिशाचं नाव घेतलं जात असल्याने अखेर तिचे वडील समोर आले आहेत

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात दिशाचं नाव घेतलं जात असल्याने अखेर तिचे वडील समोर आले आहेत

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात दिशाचं नाव घेतलं जात असल्याने अखेर तिचे वडील समोर आले आहेत

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 5 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात त्याची एक्स व्यवस्थापक दिशा सालियन हिचे नाव घेतले जात आहे. दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणात आता दिशाचे वडील समोर आले आहेत. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा हिचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूसोबत जोडून पाहिला जात आहे आणि या कारणाने पोलीस आणि मीडिया सातत्याने दिशाच्या कुटुंबीयांशी संपर्क करीत होते. दिशाच्या वडिलांनी पोलिसांत याबाबत तक्रार केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार मीडियातील लोक ज्याप्रमाणे त्यांना त्रास देत आहे आणि त्यांच्या मुलीबाबत खोटी बातमी पसरवत आहेत, यामुळे सुशांतच्या केसवर परिणाम होईल. शिवाय सालियन यांच्या कुटुंबीयांनाही याचा त्रास होत असल्याचे दिशाच्या वडिलांनी सांगितले. हे वाचा-सुशांत मृत्यू प्रकरण तपासाबाबत एक्स गर्लफ्रेंड अंकिता म्हणाली, "अखेर ती वेळ आली" दरम्यान अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतचे त्याच्या कुटुंबीयांशी पटायचे नाही. आपल्या जन्मदात्याच वडिलांसोबतच तो दूर राहत होती, अशी माहितीसमोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणावरून राजकारण तापले आहे. पण, पोलीस तपासातून हळूहळू त्याच्याबद्दलच नवी माहिती आता त्याच्या कुटुंबीयांनी प्रकाशात आणली आहे. सुशांतच्या बहिणीचे पती ओ पी सिंग यांच्यासोबत सुशांतचे तर अजिबातच पटायचे नाही. तर दुसरीकडे सुशांत त्याच्या वडिलांना बोलणे तर दूर तो फक्त एसएमएस द्वारेच उत्तर द्यायचा. भाजप नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक दावा केला आहे.
First published:

Tags: Sushant sing rajput

पुढील बातम्या