Home /News /entertainment /

सुशांत मृत्यू प्रकरणात AIIMS रिपोर्टमधील या 7 मुद्द्यांवरुन मुंबई पोलिसांचा दावा खरा ठरला!!!

सुशांत मृत्यू प्रकरणात AIIMS रिपोर्टमधील या 7 मुद्द्यांवरुन मुंबई पोलिसांचा दावा खरा ठरला!!!

दरम्यान, या सिनेमात शक्ती कपूर CBI अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अरुण बक्शी हे सुशांतच्या वडिलांची भूमिका साकारणार असून अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याती भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान, या सिनेमात शक्ती कपूर CBI अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अरुण बक्शी हे सुशांतच्या वडिलांची भूमिका साकारणार असून अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याती भूमिका साकारणार आहेत.

यापुढे तपासाच्या अँगलमध्येही बदल करण्यात येणार आहे

    नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास करणाऱ्या एम्सच्या (AIIMS) फाॅरेन्सिक एक्सपर्टच्या टीमने आपल्या रिपोर्टमध्ये सीबीआयकडे महत्त्वपूर्ण माहिती जमा केली आहे. या फॉरेन्सिक टीमच्या शेवटच्या रिपोर्टनुसार सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या हेच आहे. एम्सचे तज्ज्ञ पॅनलचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, सुशांतचा मृत्यू गळा दाबून झालेला नाही किंवा कोणीही त्याला जीवे मारले नाही. हा रिपोर्ट सुशांत प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावा ठरला असून यामुळे अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात. एम्सच्या 7 मुद्द्यांवरुन मुंबई पोलिसांनी केलेला दावा खरा ठरला आहे. सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते. मात्र अनेकांकडून ही हत्या असल्याचा आरोप केला जात होता. त्यातूनच त्याच्या मृत्यूचा सीबीआय तपास केला जात होता. त्यातच एम्सच्या रिपोर्टमुळे सुशांत प्रकरणातील गुंतागुंत कमी झाली आहे. हे ही वाचा-सुशांतची आत्महत्याच; AIIMS च्या रिपोर्टनंतर बहीण श्वेता किर्ती सिंह म्हणाली... 1 शरीरावर खूणा नाहीत एएनआयच्या रिपोर्टनुसार एम्सचे फॉरेन्सिक हेड सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही फायनल रिपोर्ट तयार केली आहे. ही पूर्णपणे गळफास लावल्यामुळे झालेली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये अनेकांनी त्याच्या शरीरावर अनेक खूणा असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ही हत्या असल्याचा दावा सुशांतच्या चाहत्यांकडून केला जात होता. मात्र सुशांतच्या शरीरावर गळफासाव्यतिरिक्त इतर कुठेही खूणा नाहीत, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2 कपड्यांवरही हातापायी झाल्याच्या खूणा नाहीत सुशांतच्या मृत्यूमागे अनेक थिअरी सांगितल्या जात होत्या. यामध्ये त्याच्यासोबत मारहाण केली गेली व त्यानंतर त्याला फासावर लावल्याचा कयास अनेकांकडून केला जात होता. मात्र एम्सच्या रिपोर्टने हे सर्व दावे खोडून काढले आहेत. सुशांतच्या शरीरावर वा कपड्यांवर हातापायी झाल्याच्या कोणत्याही खूणा दिसल्या नाहीत. 3 शरीरात विषारी द्रव्य नाही एम्सच्या 7 फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले की, एम्सच्या टॉक्सिकोलॉजी लॅबला सुशांतच्या शरीरात विषारी द्रव्य आढळले नाही. गळ्याभोवती असलेली जखम फास लावल्याने झालेली आहे. 4 एम्सचा रिपोर्ट अखेरचा एम्सच्या तज्ज्ञांनी केलेल्या या रिपोर्टनुसार सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला आहे. यामागे दुसरे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 5 फाऊल प्ले नाही सुशांतच्या मृत्यूमागे फाऊल प्ले नसून त्याने स्वत: आत्महत्या केल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. 6 कूपर रुग्णायाने यापूर्वी सांगितलं होतं.. सुशांतच्या शवविच्छेदन रिपोर्टमध्ये त्याने आत्महत्या केल्याचे कूपर रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर एम्समधील आलेल्या रिपोर्टही सारखा असल्याने मुंबई पोलिसांचा दावा खरा ठरला आहे. 7 तपासाच्या अँगलमध्ये होणार बदल यानंतर सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास त्याने केलेल्या आत्महत्येच्या अनुषंगाने होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai police, Sushant sing rajput

    पुढील बातम्या