'सुपर 30'मध्ये हृतिक साकारतोय गणितज्ज्ञ आनंद कुमार

'सुपर 30'मध्ये हृतिक साकारतोय गणितज्ज्ञ आनंद कुमार

या सिनेमाच्या निमित्तानं हृतिक रोशन आणि आनंद कुमार यांची भेटही झाली. हृतिक आनंद यांचं आयुष्य जाणून घेतोय.

  • Share this:

26 सप्टेंबर : गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर 30' सिनेमासाठी खिलाडी अक्षय कुमार आणि हृतिक रोशनच्या नावाची चर्चा होती. हृतिकने या सिनेमाकडे पाठ फिरवली असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र आता या चर्चांना फुलस्टॉप लागलाय. या सिनेमासाठी हृतिकला अखेरीस फायनल करण्यात आलंय.

सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करणारेत. तर मधु मंटेना आणि प्रीती सिन्हा सिनेमाची निर्मिती करणारेत.लवकरच या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करण्यात येणारे.

या सिनेमाच्या निमित्तानं हृतिक रोशन आणि आनंद कुमार यांची भेटही झाली. हृतिक आनंद यांचं आयुष्य जाणून घेतोय. आनंद कुमार म्हणाले, 'मला हृतिकवर पूर्ण विश्वास आहे. तो भूमिकेला योग्य न्याय देईल.'

First Published: Sep 26, 2017 07:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading