मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रात्रीस खेळ चाले : अण्णांच्या गावजेवणात विषबाधा होता होता 'अशी' टळली

रात्रीस खेळ चाले : अण्णांच्या गावजेवणात विषबाधा होता होता 'अशी' टळली

अण्णा पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पाच परतावण्याच्या निमित्तानं गावजेवणाचा बेत आखतात. त्यात खास मटन ठेवलं जातं. अख्ख्या गावाला जेवणाचं आमंत्रण असतं.

अण्णा पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पाच परतावण्याच्या निमित्तानं गावजेवणाचा बेत आखतात. त्यात खास मटन ठेवलं जातं. अख्ख्या गावाला जेवणाचं आमंत्रण असतं.

अण्णा पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पाच परतावण्याच्या निमित्तानं गावजेवणाचा बेत आखतात. त्यात खास मटन ठेवलं जातं. अख्ख्या गावाला जेवणाचं आमंत्रण असतं.

मुंबई, 25 मार्च : रात्रीस खेळ चाले या मालिकेत आता वेगवान घटना घडतायत. रोज काही ना काही वळणं येतायत. अण्णांच्या प्रतिष्ठेच्या मोहापायी दत्ताचं लग्न लावलं जातं. त्याची वाजत गाजत वरातही काढली जाते. मुद्दाम वच्छीच्या घरासमोर अण्णा वरात नेऊन बंदुकीचे बार काढतात. आधीच अण्णांच्या घरादाराचं वाईट चिंतणारी वच्छी आणखी संतापते. तथाकथित करणी वगैरे प्रकार करणाऱ्या वच्छीच्या प्रकारामुळेच दत्ताची बायको आजारी पडते. पण त्यातूनही ती वाचते. अण्णा पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी पाच परतावण्याच्या निमित्तानं गावजेवणाचा बेत आखतात. त्यात खास मटन ठेवलं जातं. अख्ख्या गावाला जेवणाचं आमंत्रण असतं. आताही वच्छी मटनामुळे विषबाधा होईल असे प्रयत्न करते. तिचा डाव तिच्यावरच उलटतो. ज्या मटनामुळे विषबाधा होणार असते, ते मटन वच्छीचा मुलगाच खातो आणि आजारी पडतो. अण्णांच्या घरचे सगळे सावध होतात आणि मोठी दुर्घटना टळते. इकडे माधवही बंडखोरी करून शहरात गेलाय. त्याच्या आईनंच त्याला पळून जायला मदत केलीय. अण्णांच्या पसंतीचीच मुलगी माधवला दाखवली जाते. अण्णा माधवला न विचारताच मुलगी पसंत आहे, म्हणून सांगतात. माधवचं शहरातल्या एका मुलीवर प्रेम असतं. माधवला गृहित धरणारे अण्णा माधवच्या नकारानं बिथरून जातात. त्यामुळेच दत्ताला लग्नाला उभं राहावं लागतं. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील अण्णा नाईक या व्यक्तिरेखेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेते माधव अभ्यंकर हे अण्णांची भूमिका साकारत आहेत. पहिल्या सीझनमध्ये माधव अभ्यंकर यांची भूमिका छोटी होती. पहिल्या भागामध्ये अण्णांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यांना मोजकेच संवाद होते. पण दुसऱ्या सीझनमध्ये त्यांची भूमिका मध्यवर्ती असल्याने पूर्णपणे मालवणी भाषेत बोलावं लागेल, असं निर्माता-दिग्दर्शकांनी त्यांना आधीच सांगून टाकलं. माधव अभ्यंकर म्हणाले, माझी मालवणी भाषा सोपी करण्यात अभिनेता लीलाधर कांबळी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांचे मालवणी भाषेतील संवाद सहज आणि स्वच्छ तसेच कुणालाही समजतील, असे असतात. माधव अभ्यंकर सांगतात, त्यांचे संवाद ऐकल्यामुळे मला मालवणी भाषेतील बारकावे समजून घेणं सोपं झालं. ते सांगतात, माझे मालवणी संवाद अधिक चांगले होण्याच्या दृष्टीने निर्मात्यांनी एका मुलाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मला आता मालवणी चांगली जमू लागली आहे. माझी जीभ आता चांगल्या प्रकारे वळायला लागली आहे. VIDEO: प्रचारासाठी अमोल कोल्हे घोड्यावर स्वार, चाहत्यांनी सेल्फीसाठी गेली गर्दी
First published:

Tags: Ratris khel chale

पुढील बातम्या