'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सोयरा मातोश्री 'असं' घेतात प्रायश्चित्त

Swarajyarakshak Sambhaji, Dr Amol Kolhe - स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत आता सोयराबाईंना पश्चात्ताप झालाय. त्यांना शंभूराजांचं बालपण आठवतंय

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 07:05 PM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सोयरा मातोश्री 'असं' घेतात प्रायश्चित्त

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सर्वच कारभाऱ्यांना शिक्षा झाली. अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखालीही दिलं. पण दरबारात अनाजी पंतांनी सोयराबाईंवरही आरोप केले होते. त्या आरोपात तथ्यही होतंच.

आता पुढचे काही दिवस मालिकेत सोयराबाईंना होणारा पश्चात्ताप पाहायला मिळणार आहे. कारभाऱ्यांनी ज्या कारवाया केल्या त्याला सोयरामातोश्रींनी विरोधही नव्हता केला. याची जाणीव त्यांना झालीय.

सोयरा मातोश्रींना संभाजीचं सगळं बालपण सोयराबाईंच्या नजरेसमोर येतं. संभाजी महाराजांची आई लवकर निवर्तल्यामुळे सोयराबाईंनीच संभाजी महाराजांचे लाड पुरवले असतात. ते त्यांना आठवतं.

संभाजी महाराज आणि येसूबाईंचं लग्नही त्यांना आठवतं.

या सगळ्याचा परिणाम होऊन ते आपल्या महालाचा दरवाजा बंद करून घेतात. येसूबाईंनाही प्रवेश देत नाहीत.कोणालाही भेटत नाहीत.

Loading...

हंबीरमामाही सोयराबाईंना दार उघडण्याची विनवणी करतात. त्या दार उघडून फक्त मामांना आत घेतात.

आपल्या हातून गुन्हा घडलाय ही भावना सोयराबाईंच्या मनात प्रबळ झालीय. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो. त्या आजारी पडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...