मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री

'रात्रीस खेळ चाले'मध्ये होतेय सुशल्याच्या आईची एन्ट्री

नानांचे एकेक पैलू समोर येतायत. त्यांच्यापासून मुलगा झाला सांगत एक बाईही वाड्यात येऊन नानाबरोबर राहू लागते. पुढे नाना तिला मारून टाकतात.

नानांचे एकेक पैलू समोर येतायत. त्यांच्यापासून मुलगा झाला सांगत एक बाईही वाड्यात येऊन नानाबरोबर राहू लागते. पुढे नाना तिला मारून टाकतात.

रात्रीस खेळ चाले मालिकेचा दुसरा भाग सुरू झालाय. पण हा भाग सिक्वल नाही, तर प्रीक्वल आहे. मराठी मालिकांमध्ये हा वेगळा प्रयोग केला जातोय.

मुंबई, 19 जानेवारी : रात्रीस खेळ चाले मालिकेचा दुसरा भाग सुरू झालाय. पण हा भाग सिक्वल नाही, तर प्रीक्वल आहे. मराठी मालिकांमध्ये हा वेगळा प्रयोग केला जातोय. या आठवड्यात रंगेल नानांचे एकेक पैलू समोर येतायत. त्यांच्यापासून मुलगा झाला सांगत एक बाईही वाड्यात येऊन नानाबरोबर राहू लागते. आता या मालिकेत आणखी एक टर्न येणार. तो म्हणजे शेवंताचा. ही शेवंता आहे तरी कोण? गेल्या वेळी जी सुशल्या होती तिची आई. होय, सुशल्याची आई शेवंता या भागात येतेय. तिची भूमिका साकारलीय अपूर्वा नेवळेकरनं. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेनं अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं होतं. या मालिकेतला नाईकांचा वाडा पाहायला आजही लोकांची गर्दी होत असते. कोकणची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अण्णांपासून हा खेळ सुरू झालाय. कोकणातली भूत एकदा मागे लागली की सोडता नाय' असा दाखला घेऊन छोट्या पडद्यावर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेनं दहशत निर्माण केली. विशेष म्हणजे कोकणी लहेजा आणि नवख्या कलाकारांना घेऊन या मालिकेनं सुरुवात केली आणि थोड्याच अवधीत लोकप्रियतेचा शिखर सर केला. पण, कोकणाचं पर्यटन आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या आरोपामुळे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेला विरोधही झाला. पहिल्या भागात नाईक कुटुंबातल्या अण्णांचा झालेला मृत्यू आणि त्यानंतरच्या गूढ घटना उत्सुकता वाढवत होत्या. जमिनीच्या वादावरुन नेने वकीलांचा खून झाला. त्याचा तपास करण्यासाठी अभिरामचा मित्र विश्वसराव हा पोलीस निघतो. तळघरात सापडलेले सांगाडे, आणि छायाच्या लग्नाच्या दिवशी अजयचा खून होणे हे मालिकेला निर्णायक वळण देणारे ठरले.
First published:

Tags: Pandu, Ratris khel chale, Shevanta, Sushlya

पुढील बातम्या