मुंबई, 09 एप्रिल : रात्रीस खेळ चाले मालिकेत दत्ताची बायको सरिता एकदमच बदलली. गेल्या काही भागांमध्ये तिचं बदललेलं रूप दिसतंय. इतकं की तिची सासू बाहेरची बाधा झाली असेल या अंधश्रद्धेनं तिच्यावरून नारळ ओवाळून टाकते.
वच्छी आणि तिच्या सुनेला वाटतं आहे, आपण सरिताला आपल्या जाळ्यात ओढलं आहे. सरितानं काशीच्या उपचारासाठी तिच्याकडचे पैसे दिले. तेव्हापासून वच्छी सरिताला नाईकांविरोधात भडकावत आहे. वच्छीला वाटतं आहे सरिताला हाताशी घेऊन आपण बरंच काही करू. पण मालिकेत एक वेगळं वळण येणार आहे.
वच्छीच्या मनात काय कावा आहे, हे सरिताला उमजतं. वच्छी नाईकांच्या वाड्याचं वाईट करायला बसलीय, हेही तिला कळतं. त्यामुळे आता ती पुढच्या भागात सरिता वच्छीच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या सुनेला सुनावते. आमच्या वाड्याकडे वाईट नजरेनं पाहिलंस तर याद राख म्हणते.
सरितानं कमी अवधीत घरातली सगळी परिस्थिती लक्षात घेतली आहे. अण्णा दत्ताला नोकरासारखे राबवून घेतात, हे तिच्या लक्षात आलं आहे. दत्तानं नोकरी करावी असं तिला वाटतं आहे.
सरितानं कमी अवधीत घरातली सगळी परिस्थिती लक्षात घेतली आहे. अण्णा दत्ताला नोकरासारखे राबवून घेतात, हे तिच्या लक्षात आलं आहे. दत्तानं नोकरी करावी, असं तिला वाटतं आहे.
सरिता पाटणकरांना दत्तासाठी नोकरी बघा म्हणून सांगते. दत्ताला ते आवडत नाही. तो रागानं घरी येतो. त्यात अण्णा दत्ताला अपमानास्पद बोलतात. त्याची लायकी काढतात. तशी सरिता अण्णांच्या अंगावर ओरडते.
अण्णांना धक्का बसतो. ते सरिताच्या दिशेनं यायला लागतात, तसा दत्ता मध्ये येऊन सरिताच्या कानाखाली देतो.
सरिताच्या या बदललेल्या रूपामुळे बऱ्याच घटना घडणार आहेत.
VIDEO : पाकिस्तानकडून काय अपेक्षा ठेवायची? पंतप्रधान मोदी म्हणतात...